शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर ‘इंजिन’ स्टेशन गाठेल? राज यांच्यासाठी ‘करो वा मरो’ची  निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:51 IST

राजकीय भूमिका बदलल्या, कधी मोदींची प्रशंसा तर कधी मोदींची चिरफाड असेही केले. भूमिकांचे असे अनेक झोके घेणारे राज आता स्वबळावर लढणार आहेत...

मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात. मातोश्रीच्या वटवृक्षाखाली वाढलेले राज ठाकरे त्या सावलीतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली. सुरुवातीच्या वर्षांमधील झंझावात आणि आलेले यश टिकले नाही. एकेकाळी १३ आमदार, नाशिक महापालिकेत सत्ता, मुंबई, ठाणे, पुण्यात नगरसेवकांची मोठी संख्या असे बळ असलेली मनसे आता चाचपडत आहे. या परिस्थितीत राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. सहा मोठे पक्ष, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांच्या गर्दीत टिकण्याचे आव्हान मनसेसमोर आहे.

राजकीय भूमिका बदलल्या, कधी मोदींची प्रशंसा तर कधी मोदींची चिरफाड असेही केले. भूमिकांचे असे अनेक झोके घेणारे राज आता स्वबळावर लढणार आहेत. निवडणुकीसाठी लागणारे कार्यकर्त्यांचे नेटवर्क त्यांच्याकडे प्रत्येक मतदारसंघात नाही. या-त्या पक्षात नाराज झालेले राज यांच्या इंजिनावर लढतील असे दिसते. 

‘करो वा मरो’ची निवडणूकही निवडणूक राज यांच्यासाठी ‘करो वा मरो’ची असेल. आपल्यासह पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच्या या संधीचे ते सोने करतात की नाही यावर त्यांचे भवितव्य ठरेल.  पुढील वर्षीच्या सुरुवातीला महापालिकांच्या निवडणुका होतील. तेव्हा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या पट्ट्यात आपले नगरसेवक निवडून आणायचे तर राज यांना विधानसभेत चांगले अस्तित्व दाखवावे लागेल. राज यांचे स्वबळ महायुतीला मारक ठरेल की महाविकास आघाडीला? तर, त्या-त्या मतदारसंघांच्या परिस्थितीवर आणि उमेदवारांवर ते अवलंबून असेल.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना