शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी दिल्यास प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 13:51 IST

पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्देपक्ष श्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यास नेहमीच तयारकोल्हापूरात ‘शेतकरी सन्मान भवन’ इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य महसूल, कृषी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.येथील शेंडा पार्कातील कृषी संशोधन केंद्राच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ‘शेतकरी सन्मान भवन’ इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज, गुरुवारी सकाळी झाले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सूतोवाच केले.सध्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारणा केली असता, मंत्री पाटील यांनी पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य केले.

कागल विधानसभा लढण्याची तयारीकागल विधानसभा लढण्याची तयारी पुणे  ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे या दोघांनीही सुरु केली आहे. त्याबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, विधानसभेची निवडणूक या दोन घाटगेंपैकी एक जणच लढणार आहे. दोघातील कोण ? हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील.

राज्यामध्ये प्रथमच अशा स्वरूपाचे शेतकऱ्यांना सर्व सेवा एकत्र मिळण्यासाठीचे केंद्र उभारण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे उपस्थित होते. कृषी विभागाच्या विविध योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी व शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान व सुविधा एकत्र उपलब्ध होण्यासाठी शहरातील कृषी विभागाची सर्व कार्यालये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व त्यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती म्हणून हे भवन मंजूर झाले आहे. हे भवन कृषी संशोधन केंद्राच्या आवारातच असल्याने कार्यालयास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाकडील संशोधन पाहता येणार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर