शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळावे घेणार, तिथेच नियुक्ती देणार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 06:52 IST

Devendra Fadnavis : केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या शनिवारी दिल्या. त्या निमित्त रेल्वेच्या अजनी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी २०० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

नागपूर : राज्य सरकारच्या वतीने यापुढे जिल्हा व तालुका पातळीवर रोजगार मेळाव्यांचे आयोजन करुन तिथेच तरुण-तरुणींना खासगी कंपन्यांमध्ये नियुक्तीची पत्रे  दिली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच येत्या वर्षभरात ७५ हजार सरकारी नोकऱ्या दिल्या जातील असेही त्यांनी जाहीर केले. केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या शनिवारी दिल्या. त्या निमित्त रेल्वेच्या अजनी येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी २०० जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

फडणवीस म्हणाले, की उद्योगांना विशिष्ट कौशल्य असलेले तरुण-तरुणी रोजगारासाठी मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे तर दुसरीकडे आमच्या हाताला काम नाही, अशी तरुणाईची तक्रार आहे. हे लक्षात घेता यापुढे रोजगार मेळावे घेतले जातील. विविध कंपन्यांचे मालक, अधिकारी यांना त्या ठिकाणी बोलविले जाईल. नोकरीसाठी इच्छुकांची माहिती सरकारच्या वतीने कंपन्यांना दिली जाईल. तिथेच मुलाखती होतील आणि नियुक्ती पत्रेही दिली जातील.

टीसीएस, आयबीपीएसमार्फत परीक्षाराज्यात ७५ हजार पदे  शासकीय भरती परीक्षा नामांकित कंपन्यांमार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड पदभरतीच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांमार्फत घेण्यात येणार आहेत. या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी व शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येणार आहेत.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध होत आहेत. आज एकाचवेळी ७५ हजार सरकारी नोकऱ्या दिल्या गेल्या. पंतप्रधानांच्या या रोजगारभिमुख दृष्टिकोनाला महाराष्ट्र सरकारचीही दमदार साथ असेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसjobनोकरी