शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

...तर शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार; लक्ष्मण हाकेंनी वाचून दाखवली समर्थन यादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:28 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. ते बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीच्या सांगण्यावरुन प्रचार केला. आता ओबीसी समाज एकटवल्याने मनोज जरांगे यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरुन घेतली आहे. रणांगणात लढायला वाघाचे काळीज लागते, गनिमी कावा करायचा काळ गेला, या शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यातच आता लक्ष्मण हाके यांनी ३५ मतदारसंघात पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार

शरद पवार यांच्या उमेदवारांना पाठिंबा असेल पण तो अटीवर असेल. ओबीसींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लावणार नाही, याला जर शरद पवार यांच्या उमेदवारांचे समर्थन असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.  शरद पवारांचा प्रचार नाही. शरद पवारांचा एखादा ओबीसी उमेदवार असेल, तो ओबीसी आरक्षणाबाबत आम्हाला कन्व्हिन्स करणार असेल तर आम्ही त्यांची सभा घेऊ. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. माझ्या ६०-७० सभा महायुतीच्या विरोधात झाल्या आहेत. त्यामुळे मी महायुतीचा आहे, असे म्हणू शकत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. ओबीसीचे जे निवडून येणारे उमेदवार आहेत ते कोणत्याही पक्षाचे असोत आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. आमचे पाठिंबा असलेले उमेदवार – सांगोला, जत, मुखेड, मान, लातूर पूर्वचे आहेत. कोणत्याही पक्षाचा असो. पण निवडून येणारा असावा, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, बाँड पेपर सोडा हो, संविधानाची शपथ घेऊन लोक जागत नाही. मी तर जरांगे पाटील यांना शिलालेखावर लिहून घ्या म्हणून सांगितले होते. त्यामुळे बाँड पेपर सोडा. कुणाची किती नियत साफ आहे हे आम्हाला कळते. मनोज जरांगे पाटील हा दिवसाला भूमिका बदलणारा माणूस आहे. ते मुंबईच्या वेशीवरुन माघारी परतले होते. त्यांचा राजकारण, निवडणूक याबद्दल अभ्यास नाही. ज्यांनी जरांगे यांना पाठींबा दिला होता, त्यांचा कार्यक्रम  आता ओबीसी करणार, त्यांना निवडणुकीत पाडणार, ज्यांनी पत्र दिले, त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार, असा एल्गार हाके यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४laxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षण