शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजीपाल्याची वाहतूक थांबवणार; मालवाहतूक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:56 IST

देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही.

पुणे : देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही. सरकारने मागण्यांबाबत विचार न केल्यास भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचीवाहतूक थांबविण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसे पत्र केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे.देशभरातील डिझेलचा दर समान करावा, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रिमीयम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांचीसक्ती करू नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटन वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा, अशाविविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदेलनाची हाक दिली आहे.चक्का जाम आंदोलनामुळे उद्योग-व्यवसायांचे दररोज २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान केवळ वाहतूक क्षेत्राचे आहे.देशात १ कोटी ट्रकचालक असून, आॅल इंडिया मोटार संघटनेकडे दीड कोटी सभासद आहेत. सरकारकडून मागण्यांचा विचार न झाल्यासपुढील टप्प्यात दूध, पेट्रोल-डिझेल टँकर, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे.माथाडी कामगारांचा आज बंदट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून बेमुदत बंद व चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांचे काम व मजुरी ट्रान्सपोर्ट व्यवसायावर अवलंबून आहे.यामुळे वाहतुकदारांच्या बेमुदत बंदला पांठिबा देण्यासाठी व मराठा आंदोलन व आरक्षण मिळावे यासाठी औरगांबाद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांना जलसमाधी घेऊन प्राणांची आहुती द्यावी लागली.या घटनेच्या निषेधार्थ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीने बुधवारी (दि. २५) बंद पुकारला आहे.

 

टॅग्स :Strikeसंपvegetableभाज्या