शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा रोखणार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:14 IST

नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर येईल गदा; भाजपविरोधकांना एकत्र आणणार

नागपूर : केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता सोशल मीडियावर निर्बंध आणणारा कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरच गदा येणार असून, ते विधेयक रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पवार सध्या तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करताना त्याला देशातून एवढा विरोध होईल, असे वाटले नव्हते. मात्र, केंद्राच्या या विचाराला देशभरातील तरुणांनी छेद दिला. या कायद्याच्या विरोधात निषेधाचा सूर तीव्र झाला आहे. हा सूर देशात सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल, असे भाकीतही पवार यांनी वर्तविले.

सध्या देशातील अनेक विद्यापीठांतील तरुण नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. १९७७ साली देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात बंड पुकारले होते. तरुणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतर करूनच झाला. त्यामुळे सध्या देशभरात तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण आगामी सत्तांतराचे दिशादर्शक असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गतीने स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचली आहे. आगामी निवडणुकांत तिन्ही पक्षांच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी एकत्र बसून त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पद वाटपाची सकारात्मक बोलणी करावी, असे आपण आमदारांना कालच्या बैठकीत सांगितले. मात्र, त्यांनी आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरवूनही टाकले आहेत, असे पवार यांनी गमतीने सांगितले.

गाडी योग्य दिशेने जात आहे!दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाशी केली होती. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ‘याचा अर्थ गाडी बरोबर दिशेने जात आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकायला आता काही अडचण दिसत नाही,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.भाजपचे खासदार चोरून माझे अभिनंदन करत होते!महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर इतर पक्षांचे खासदार, नेते संसद भवनात जाहीरपणे माझे अभिनंदन करत होते. मात्र, भाजपचे खासदार, मंत्री जेव्हा भेटायचे, तेव्हा ते आधी आजूबाजूला बघायचे, कोणी पाहात तर नाही ना, याची खात्री करायचे आणि मग माझा हातात हात घेऊन घट्ट दाबून अभिनंदन करायचे, असे दिलखुलास हसत आणि अ‍ॅक्शन करत शरद पवारांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSocial Mediaसोशल मीडिया