जळगाव : क्रॉम्प्टन वीजपुरवठा कंपनीचे शाखाधिकारी चेतन मेहता यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सोमवारी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह पाच जणांना अटक होण्याची शक्यता आहे.चेतन मेहता यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी जिल्हा परिषद सभागृहातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक किसन पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली. सभागृहातील फूटेजमध्ये काही आक्षेपार्ह आढळून आले तर मेहतांचीही अटक अटळ मानली जात आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेच्या आमदाराला अटक होणार?
By admin | Updated: April 13, 2015 04:52 IST