शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेत राहणार, उलटसुलट चर्चांवर सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 08:42 IST

सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण बंडखोरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. राऊत  म्हणाले की, मी कशाला गुवाहाटीला जाऊ. जायचे असेल तर मी गोव्याला जाईन.

मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत हेसुद्धा बंडखोरी करत गुवाहाटी गाठणार असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. अखेर स्वत: सुनील राऊत यांनी सोमवारी त्याचे खंडन करत अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण बंडखोरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. राऊत  म्हणाले की, मी कशाला गुवाहाटीला जाऊ. जायचे असेल तर मी गोव्याला जाईन. तिथेही निसर्ग आहे. गुवाहाटीत गद्दारांची तोंडे पाहण्यापेक्षा मी गोव्याला जाईन. बाकी, या बातम्या केवळ जाणून-बुजून पसरवल्या जात आहेत. सुनील राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. आम्हाला कापले तरी शिवसेना आणि बाळासाहेब असतील. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेनेतच राहणार आहोत. राऊत म्हणाले की, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे आमचे कुटुंबीय आहेत. जे काही राहिले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले, त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढवली. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. माझ्या मतदारसंघात दोन्ही वर्षांत मी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sunil Rautसुनील राऊतSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना