शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

९ डिसेंबरपर्यंत ट्विट करणार नाही - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 07:50 IST

"समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही."

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे, त्यांचे वडील किंवा कुटुंबातील अन्य सदस्याविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतेही ट्विट करणार नाही किंवा सार्वजनिक वक्तव्यही करणार नाही, अशी हमी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही, असे न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने म्हटल्यावर नवाब मलिक यांचे वकील कार्ल तांबोळी यांनी समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत (९ डिसेंबर) ट्विट व सार्वजनिकरीत्या वक्तव्य न करण्याचे आश्वासन दिले. ‘तुम्ही आश्वासन दिले नसते तर आम्ही मंत्र्यांना पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात वक्तव्य व ट्विट करण्यास मनाई करणार होतो. मलिक द्वेषापोटी असे वागत असल्याचे उघड आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. 

मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात र्वजनिकरीत्या वक्तव्य करण्यास व ट्विट करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने नकार दिल्याने समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठापुढे अपिलात गेले. मंत्र्यांनी याबाबत जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? तांबोळी यांनी नकार देताच न्यायालयाने म्हटले की, मग मलिक अशी वक्तव्य का करत आहेत? जात पडताळणी समितीकडे तक्रार केली का? जर तक्रार केली नसेल, तर ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत का? चुकीची जात दाखवली असेल तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध आहे.

पुढील सुनावणी ९ डिसेंबरला -- तांबोळी यांनी सूचना घेण्यास वेळ मागितली. थोड्या वेळाने तांबोळी यांनी वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मलिक यांनी ९ डिसेंबरपर्यंत ट्विट न करण्याची हमी न्यायालयाला दिली. न्यायालयाने त्यांचे आश्वासन मान्य केले. - मलिक यांची सून न्यायालयात उपस्थित असल्याने न्यायालयाने याबाबत शंका उपस्थित केली. यामध्ये मंत्र्यांचे पूर्ण कुटुंब सहभागी आहे? त्या (मलिक यांची सून) इथे का आहेत? असे विचारत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ९ डिसेंबर रोजी ठेवली आहे.वागत असल्याचे उघड आहे,’ असे न्यायालयाने म्हटले. मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सार्वजनिकरीत्या वक्तव्य करण्यास व ट्विट करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने नकार दिल्याने समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठापुढे अपिलात गेले.

मंत्र्यांनी याबाबत जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? तांबोळी यांनी नकार देताच न्यायालयाने म्हटले की, मग मलिक अशी वक्तव्य का करत आहेत? जात पडताळणी समितीकडे तक्रार केली का? जर तक्रार केली नसेल, तर ते काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत का? चुकीची जात दाखवली असेल तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेCourtन्यायालय