शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:08 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: बारामती पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवार रिंगणात असल्याचे म्हटले जात आहे.

NCP SP Group MP Supriya Sule News: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्यासह एकूण ३० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. छाननी प्रक्रियेनंतर ५३ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून काँग्रेसने उमेदवार माघारी घ्यावा, अशी विनंती केली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीने शेवटपर्यंत प्रयत्न केले. यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या वहिनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायला जाऊ शकतात, असे म्हटले जात आहे. 

बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे. पण, याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजसपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती.त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत. आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल.

सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? 

पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, त्यांनी विचारायला हवे. पैसा आणि सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे असते. त्यामुळेच मी नेहमी सांगते की, रिश्ते मायने रखते है. संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का होऊ शकली नाही, याबाबतचे उत्तर तुम्ही त्यांनाच विचारा. कारण यासाठीची सर्व मॅनेजमेंट तेच पाहत होते. दिवसभर बारामतीत नव्हते. त्यामुळे नेमके काय घडले, याची मला माहिती नाही. निवडणूक काळात निवडणूक लढविण्यास कार्यकर्ते उत्सुक असतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule hints at campaigning for Sunetra Pawar; family matters!

Web Summary : Supriya Sule indicated support for Sunetra Pawar, emphasizing family over politics. Despite Congress withdrawing from the Baramati by-election, Sule highlighted the importance of relationships and the family's backing for Sunetra.
टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूक 2026Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवार