नवनीत राणा प्रहारच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? बच्चू कडूंनी विधानसभेचेही पत्ते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:40 AM2024-01-03T11:40:07+5:302024-01-03T11:41:02+5:30

सध्या आम्ही कोणाच्याही बाजुने नाही आहोत. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार. - बच्चू कडू

Will Navneet Rana contest the Amravati Lok Sabha seat on Prahar's ticket? Bachu Kadu also opened the addresses of the Legislative Assembly election | नवनीत राणा प्रहारच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? बच्चू कडूंनी विधानसभेचेही पत्ते उघडले

नवनीत राणा प्रहारच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? बच्चू कडूंनी विधानसभेचेही पत्ते उघडले

सध्या आम्ही कोणाच्याही बाजुने नाही आहोत. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार. अमरावतीची लोकसभेची जागा आम्हाला हवी आहे. त्यावरून भूमिका ठरवू, असा इशारा ठाकरे सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटासोबत असलेल्या बच्चू कडू यांनी दिला आहे. याचबरोबर त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. 

महायुतीत अमरावतीची जागा आम्हाला हवी आहे, असे सांगताना नवनीत राणा यांनी हवे तर प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अकोला, अमरावतीसह तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असे कडू म्हणाले. यावर राणांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

याचबरोबर कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठीही जागा वाटपाचे पत्ते उघड केले आहेत. लोकसभेला ३ आणि विधानसभेला १५ जागांवर लढणार आहोत. येत्या १५ जानेवारीनंतर बैठक घेऊन पुढील भुमिका मांडू असे कडू यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करणे म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखे झाले आहे. शिपायाला, हॅाटेलमध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पॅकेज देऊन काही उपयोग नाही, कायमस्वरुपी तोडगा हवाय. या साऱ्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोपही कडू यांनी शिंदे सरकारवर केला आहे.  

Read in English

Web Title: Will Navneet Rana contest the Amravati Lok Sabha seat on Prahar's ticket? Bachu Kadu also opened the addresses of the Legislative Assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.