शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

पंतप्रधान मोदी संघस्थानाला भेट देणार की नाही?

By admin | Updated: April 10, 2017 21:15 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.मोदी संघ मुख्यालय किंवा संघ स्मृतिमंदिराला भेट देणार की नाही

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 -  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासंबंधी अद्याप अंतिम वेळापत्रक आले नसून, मोदी संघ मुख्यालय किंवा संघ स्मृतिमंदिराला भेट देणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे. संघाचे मोठे पदाधिकारी यादिवशी नागपुरात नसले तरी मोदींनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट द्यावी, अशी संघ स्वयंसेवकांची भावना आहे. नागपूर नरेंद्र मोदींसाठी नवे शहर नाही. प्रचारक होण्यापूर्वी व त्यानंतरदेखील अनेकदा ते रेशीमबागेत वास्तव्याला राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांअगोदर निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर लागलीच मोदी यांनी १६ जुलै २०१३ रोजी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर देशात सत्ताबदल झाला व पंतप्रधानपदाची सूत्रे मोदींकडे आली. त्यानंतर नरेंद्र मोदी हे दोनवेळा नागपूरला येऊन गेले. २१ आॅगस्ट २०१४ रोजी मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन समारंभ तर ७ आॅक्टोबर २०१४ रोजी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेसाठी ते आले होते. मात्र दोन्ही वेळेला मोदी यांनी संघ स्मृतिमंदिर किंवा संघ मुख्यालयात जाणे टाळले होते.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधून पंतप्रधान दीक्षाभूमीवर जाणार आहेत. येथे भेट देणारे ते तिसरे पंतप्रधान ठरतील. याच दिवशी मोदींनी संघस्थानालादेखील भेट द्यावी, अशी संघ स्वयंसेवकांची अपेक्षा आहे. संघाची परंपरा लक्षात घेतली तर मोदींना आमंत्रण देण्यात येणार नाही. मात्र जर मोदींनी येण्याची इच्छा दर्शविली तर संघाकडून त्यांचे यथोचित स्वागत करण्यात येईल. मात्र अद्याप मोदींचा अंतिम कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयातून जारी झालेला नाही. त्यामुळे मोदींच्या संघस्थानावरील भेटीबाबत संभ्रम कायम आहे. अटलबिहारी वाजपेयींनी दिली होती भेटपंतप्रधानपदी असताना संघ मुख्यालयात येणारे अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव पंतप्रधान आहेत. २६ आॅगस्ट २००० रोजी वाजपेयी ज्येष्ठ संघ प्रचारक नारायणराव तार्ते यांची भेट घेण्यासाठी रेशीमबागेत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी हेदेखील होते. तत्कालीन सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांच्यासोबत वाजपेयी यांची भेट झाली नव्हती, हे विशेष. जर मोदी यांनी १४ एप्रिल रोजी संघस्थानाला भेट दिली तर ते असे करणारे देशाचे दुसरे पंतप्रधान ठरतील. सरसंघचालकांच्या दौ-यात बदल?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १४ एप्रिल रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुरात नाहीत. मात्र प्रवासादरम्यान एका दिवसासाठी डॉ. भागवत १४ एप्रिल रोजी नागपुरात येण्याची शक्यता आहे. याबाबत संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले आहे. संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुल पिंगळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.