शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उद्या मोठी घोषणा करणार! उदयनराजेंच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:43 IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे कोणत्या-ना-कोणत्या कारणाने मीडियामध्ये चर्चेत असतात. उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने ओळखले जातात. तसेच, डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची त्यांची स्टाईल आदींमुळे ते सोशल मिडियावर चर्चेत येतात. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत उद्या म्हणजेच 24 तारखेला साताऱ्यात एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नेमकी कोणती घोषणा उदयनराजे भोसले करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ह्या 24 तारखेला एक मोठी घोषणा करायचे मनात आहे. राजकीय आरोप-प्रतिआरोपांच्या ह्या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील, त्यामध्ये काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे, तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. 

याचबरोबर, आपण सारेच आपल्या भोवती सुरु असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरूस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.  

याशिवाय, कोणता प्रश्न, काय व्यवस्था... अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही सदर पत्राने आमंत्रण देत आहोत, असे ट्विटमध्ये म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकार आणि जनतेला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता साताऱ्यातील विकास कामांबाबत उदयनराजे भोसले बोलणार आहेत की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकीय भूमिका मांडणार आहेत, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली होती. साताऱ्यातील विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती. मात्र, बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यावेळी उदयनराजे भोसले मीडियासमोर येताच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय समभाव अशी सूचक प्रतिक्रिया देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडले होते. त्यामुळे ते खरंच राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा रंगली होती.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर