शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणेंची साथ सोडणार ? 21 सप्टेंबरला राहणार अनुपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 13:56 IST

नारायण राणेंना त्यांच्या संभाव्य बंडात काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर साथ देणार का ? याविषयी सुद्धा साशंकता आहे. 

ठळक मुद्दे2005 साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी कालिदास कोळंबकरही त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले.नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले त्यावेळी शिवसेनेतील काही आमदार, नेते त्यांच्यासोबत होते.

मुंबई, दि. 19 - काँग्रेस विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे येत्या 21 सप्टेंबरला घटनस्थापनेच्या मुहूर्ताला आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत घोषणा करणार आहेत. नारायण राणे नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. यावेळी नारायण राणेंना त्यांच्या संभाव्य बंडात काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर साथ देणार का ? याविषयी सुद्धा साशंकता आहे. 

2005 साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी कालिदास कोळंबकरही त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी शिवसेनेच्या आमदाराकीचा राजीनामा दिला व काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला. नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले त्यावेळी शिवसेनेतील काही आमदार, नेते त्यांच्यासोबत होते. पण मधल्याकाळात यातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी राणेंची साथ सोडून शिवसेनेमध्ये पूर्नप्रवेश केला. 

पण कोळंबकर अजूनही राणेंसोबत आहेत. कट्टर राणेसमर्थक आमदार अशी त्यांची ओळख आहे. पण पुढच्या काही दिवसात हे समीकरण बदलू शकते. कालिदास कोळंबकर वडाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. गेली अनेकवर्ष ते या विभागातून निवडून विधानसभेवर गेले आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांचा पराभव करता आला नव्हता. काहींशे मताच्या फरकाने ते विजयी झाले होते. 

काल नारायण राणेंनी सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन केले. यावेळी राणे यांचे नेतृत्व मान्य असणारे अनेक नेते व्यासपीठावर होते. पण कालिदास कोळंबकर यांची मंचावरील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. राणे यांच्या संभाव्य बंडामध्ये कोळंबकर त्यांच्यासोबत जाणार की, विरोधात याविषयी राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. मतदारसंघातील कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपण सिंधुदुर्गातील राणेंच्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही असे कोळंबकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 21 सप्टेंबरला मतदारसंघात घटस्थापनेचा कार्यक्रम असल्याने आपल्याला राणेंसोबत हजर राहणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोळंबकर राणेंसोबत जाणार की, आपला स्वतंत्र निर्णय घेणार ते पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होईल. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे