शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्राचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत वाढविणार -  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 15:54 IST

शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देमाहूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभराज्यात जलसिंचन क्षेत्र वाढावे यासाठीच नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत २४ हजार कोटी खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले

- गोकुळ भवरे/नितेश बनसोडेमाहूर (जि. नांदेड): शेतकरी आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ १५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येते.हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तथा जलसंपदा विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. येत्या काळात ‘मागेल त्याला वीजपुरवठा’ देण्याचा आमचा निश्चय आहे. या उपक्रमामुळेही सिंचनक्षेत्रवाढीला मदत होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

गडकरी यांच्या हस्ते सोमवारी माहूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, वस्त्रोद्योग आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री मदन येरावार, खा. राजीव सातव, लातूरचे खा. सुनील गायकवाड, आदिलाबादचे खा. नागेश घोडाम, आ.प्रदीप नाईक, आ. सुभाष साबणे, आ. नागेश पाटील अष्टीकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजू तोडसाम, आ. राजेंद्र नजरधने, आ. तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष फेरोज दोसानी, माजी खा. डी. बी. पाटील, सुभाष वानखेडे, सूर्यकांता पाटील, अशोक सूर्यवंशी पाटील, राम पाटील रातोळीकर, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांचे चित्र बदलण्यासाठी साडेआठ हजार कोटींचे प्रकल्प दिल्याचे सांगत रेणुकामाता हे माझे कुलदैवत आहे. त्यामुळे माहूरच्या विकासासाठी कुठलीही कमतरता पडू देणार नसल्याचा शब्द गडकरी यांनी दिला. माहुरच्या विकासाला गती देण्यात यश आले असून रेणुकामातेच्या दर्शनासाठी रोपवेचे कामही लवकरच मार्गी लावू, असे ते म्हणाले. मनुष्याच्या शरीरात ज्याप्रमाणात रक्त वाहिन्या काम करीत असतात त्याच पद्धतीचे काम विकासामध्ये रस्त्याचे असते. मी राज्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रस्ताव सादर केला होता. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यश आले. केंद्रात बांधकामंत्री झाल्यानंतर राज्यात २२ हजार किमीचे रस्ते तयार करण्यात यश आले. नांदेड जिल्ह्यातील चार महामार्गाबरोबरच सारखणी-मांडवी-आदिलाबाद या ४५ किमी अंतराच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करीत असल्याचे सांगत या रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गडकरी यांचा सत्कार केला. भाजपा जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह अशोक पाटील सूर्यवंशी यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. आ. प्रदीप नाईक यांनी मागणी केलेल्या सारखणी-मांडवी-आदिलाबाद या मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने नाईक यांनीही गडकरी यांचे आभार मानले. प्रास्ताविक उत्तम कानिंदे यांनी, सूत्र संचालन   प्रभारी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर तर आभार अंशुमनी श्रीवास्तव यांनी मानले.

किमान गाळ उपसा माहूर येथे झालेल्या या कार्यक्रमात गडकरी यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. राज्यात जलसिंचन क्षेत्र वाढावे यासाठीच नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत २४ हजार कोटी खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केल्याचे सांगत या उपक्रमामुळे येणा-या काळात जायकवाडीसह मराठवाड्यातील सर्वच धरणे तुडूंब भरलेली दिसतील. मात्र या धरणांची क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे.  नवरदेवाला सूट-बुटासह टाय घेऊन देण्याचे काम केंद्राने केले आहे. राज्य सरकारने किमान नवरदेवासाठी अंतरवस्त्रे खरेदी करावीत, अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली. 

तीन घिरट्यानंतर सापडले हेलिपॅडसोमवारी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी नितीन गडकरी माहुरला येणार म्हणून प्रशासनाच्या वतीने हेलिपॅड उभारण्यात आले होते. नियोजितवेळी गडकरी यांचे हेलिकॉप्टर माहूर परिसरात आले. मात्र हेलिपॅड न दिसल्याने गडकरी यांच्या हेलिकॉप्टरने माहूर शहराला तब्बल तीन घिरट्या घातल्या. चौथ्या फेरीवेळी हेलिपॅड नजरेस पडल्यानंतर ते सुरक्षितरित्या हेलिपॅडवर लँड झाले. या प्रकारामुळे काहीकाळ धास्तावलेल्या अधिकारी-कर्मचा-यांचा जीव भांड्यात पडला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी