शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

''मराठा आंदोलकांवरचे पाच वर्षांतील अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाणार?''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:30 IST

मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे

मुंबईः आरे आणि नाणार प्रकरणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर आज सह्याद्रीवर कॅबिनेटची बैठक घेण्यात आली, चार तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आहे.  मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असून, मराठा आंदोलकांच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. निरपराध लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. राज्याच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल, ते करण्याचा निर्णय आणि चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली आहे. कुठला माणूस आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे कधीही पाहिलं जाणार नाही. नवीन सरकार आहे, नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता प्राथमिकता कुठल्या प्रकल्पाला दिली पाहिजे, हे ठरवणं राज्य सरकारचं काम आहे. राज्याच्या हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले जातील. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे. कर्जाचा विषय आहे. याबाबतीत सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे.मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत आरे आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेतलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. आरे आणि नाणारप्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणी आता सुरू झाली आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण