शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारात जुन्या मंत्र्यांना डच्चू,नव्या चेहऱ्यांना संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:08 IST

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

ठळक मुद्दे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱ्यांना डच्चू जेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं.

मुंबई- राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱ्यांना डच्चू जेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. राज्यातील भाजपा सरकारला ३१ ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत बाकी  राहीलेले सगळे प्रकल्प पूर होतील. प्रकल्प पूर्ण करायचं ध्येय गाठायला आम्हाला नक्की यश येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नव्या एनडीएमध्ये नारायण राणे यांना सहभागी करून घेण्याची चिन्हं जास्त आहेत तसंच जुन्या काही मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काही समस्या निर्माण झाल्याची कबुली दिली तसंच 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. आमच्याबरोबर सत्तेत असेलली शिवसेना विरोधाची भूमिका घेते हे दुर्देवी आहे. आम्ही जनहितार्थ घेतलेल्या निर्णयावरही शिवसेनेकडून टीका होते, याचा शिवसेनेला फायदा होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा आमची कामगिरी उत्तमकाँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असतानाच्या परिस्थितीची आत्ताच्या परिस्थितीशी तुलना केली तर आमची कामगिरी उत्तम आहे. पण अजूनही आम्हाला सुधारणा हव्या आहेत. आम्ही पूर्णपणे पारदर्शी प्रशासन केलं असून उर्वरीत सगळे प्रकल्प 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. 

कोणाला मिळणार नारळ?राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपीमिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. तर एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही योग्य आणि वेगळं काम केलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत.

त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना मुख्यमंत्री नारळ देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारministerमंत्री