शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुढची निवडणूक लढविणार! नितीन गडकरींनी राजकीय वर्तुळातील उलटसुलट चर्चांना दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 08:24 IST

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार, अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, यावर भाष्य करत आपण पुढची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार, अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, यावर भाष्य करत आपण पुढची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज फाटक, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, गोविंद स्वरुप, दिग्विजय साने उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, निवडणुकीत लोकच मायबाप असतात ते निवडून देतात. मी आयुष्यात ठरविले की कोणाच्या गळ्यात हार टाकणार नाही. गेली ४० वर्षे कोणी माझ्या स्वागताला येत नाही. मी स्वत:चे कटआऊट लावत नाही, पोस्टर लावत नाही. कोणाला चहापाणी देत नाही. पुढच्या निवडणुकीतही मी तेच ठरविले आहे, मत द्यायचे तर द्या; पण  लोकांना मी माहिती आहे अन् ते मत देतात,  कारण त्यांनाही काम करणारी माणसे हवी असतात.

गडकरी म्हणाले, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून महापालिका आणि नगरपालिकांची गुणवत्ता व कार्यपद्धती सुधारणे आणि त्या आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे. या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता, देशासाठी कसा होईल, टाकाऊपासून त्याचे रुपांतर संपत्तीत कसे होईल, यासाठी संशोधन करून नवीन संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमलात आणाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ५२ शाखा असून, पाच लाख विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत आजवर प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती रणजित चव्हाण यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण