शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आपल्या टिपूभक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 21:17 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याने भाजपने रणशिंग फुंकले आहे.

राज्यातील राजकारण आता महापुरुषांच्या सन्मानावरून कमालीचे तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याने भाजपने रणशिंग फुंकले आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानाचा अत्यंत कडक शब्दांत निषेध करत, हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला हल्ला आणि 'इतिहासद्रोह' असल्याचे म्हटले आहे. या विधानावरून बावनकुळे यांनी केवळ काँग्रेसलाच नाही, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही धारेवर धरले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

"काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्याशी करणे हा प्रकार अत्यंत संतापजनक व महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान व इतिहासद्रोहच आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले ते न्याय, स्त्रीसन्मान आणि लोककल्याण यांच्या भक्कम तत्त्वांवर! इतिहासात टिपू सुलतानाच्या कारकिर्दीबाबत अनेक ठिकाणी धार्मिक अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर आणि क्रूर दडपशाहीचे उल्लेख आढळतात. याला केवळ आपल्या लांगुलचालनाच्या स्वार्थी राजकारणासाठी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणणे, याहून नीचपणाचे अधिक काय असेल? 

काँग्रेसचे लांगूलचालनाचे राजकारण आणखी किती नीच पातळी गाठणार? मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. छत्रपती शिवराय हे प्रत्येक भारतीयाच्या श्रद्धेचे स्थान आहे, असंख्य शिवप्रेमींचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या तेजस्वी कार्याशी तुलना टिपू सुलतानाशी करणे हा छत्रपती शिवरायांचा, महाराष्ट्राचा आणि जगभरातील प्रत्येक शिवप्रेमीचा घोर अपमान आहे.राष्ट्रभक्त भारतीयांचा सुद्धा तो अपमान आहे. 

महाराष्ट्र सवाल करतोय, काँग्रेस आपल्या टिपूभक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का? उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार की पुन्हा मुग गिळून गप्प राहणार? पवार साहेब, छत्रपती शिवरायांचा हा अपमान सहन करणार का? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, या राज्यातील प्रत्येक मराठी माणूस आणि जगातील प्रत्येक शिवप्रेमी या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाक घासून माफी मागा!!!"

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

"छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे," अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत व्यक्त केले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress to sack Tipu-loving president? Bawankule attacks Sapkal's Shivaji comparison.

Web Summary : Bawankule slams Sapkal's Shivaji-Tipu comparison, calling it an insult to Maharashtra. He questions Congress, Thackeray, and Pawar's silence, demanding Sapkal's apology. Sapkal praised Tipu Sultan's fight against the British, equating him to Shivaji Maharaj in bravery.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळnagpurनागपूर