शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक स्मार्ट कधी होणार? जुनेच प्रकल्प; नव्यांचे नाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:07 IST

स्मार्ट सिटी योजनेतंर्गत जुन्याच कामांना कल्हई करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची दत्तक घेतलेले नाशिक शहर स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

- संजय पाठक नाशिक : स्मार्ट सिटी योजनेतंर्गत जुन्याच कामांना कल्हई करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची दत्तक घेतलेले नाशिक शहर स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.नाशिक शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने नाशिकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र २ हजार १९४ कोटी रूपयांच्या योजनेसाठी सरकारकडून भरघोस निधी मिळाला, परंतु कामे पुढे सरकली नाहीत. उलट जुन्या कामांचा रेट्रो फिटींग अंतर्गत सामावेश असल्याने रस्ते, उद्यानाचे नुतनीकरण आणि स्मशानभूमीत विद्युतदाहिनी अशी सपक कामे घुसविण्यात आली. तीन वर्षे उलटत आली तरी ई पार्किंग, सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदा ग्रीन फिल्ड अंतर्गत पाचशे एकरात नियोजनबद्ध विकास करणे, गावठाण विकास, चोवीस तास पाणी पुरवठा ही सर्व कामे केवळ चर्चेत आहेत.स्मार्ट सिटी कंपनीने कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे नुतनीकरण करून दिले, त्याचे लोकार्पण झाले. गोदावरी नदीवरील पुल, नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी बसविणे यासारखी कामे महापालिकाही सहज करू शकली असती. कंपनीला ३८४ कोटी रूपये निधी मिळाला परंतु कामे दिसत नाहीत.सीसीटीव्ही बसविणे व फायबर आॅप्टिक केबल टाकण्याची कामे राज्य सरकारने ताब्यात घेतली असून त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. पाचशे एकरात ग्रीन फिल्ड विकास योजना करण्याचा मानस होता मात्र महपाालिकेचा अंशत: आराखडा मंजुर असून त्यामुळे नगररचना योजना राबविण्याची अधिसूचना निघालेली नाही.ही कामे होणार : ई टॉयलेट, पर्यटन केंद्र, इ-पार्किंग, प्रोजेक्ट गोदा, स्मार्ट लाईट, कुशल कौशल्य योजनामहापालिकेला आगाऊ निधी मिळाला आहे. कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण झाले आहेत. ई-पार्किंगचे काम सुरू आहे. स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अन्य अनेक कामांसाठी निविदा मागवल्या असून, काम वेगाने पुढे जात आहेत.- रंजना भानसी, महापौर

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashikनाशिक