शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य लोकसभा निवडणूक लढवणार का?; उद्धव ठाकरे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:29 IST

सुजय विखे पाटील यांच्यावरुन उद्धव यांचा शरद पवारांना टोला

मुंबई : आदित्य आताची लोकसभा निवडणूक लढणार नाही, पण भविष्यात निवडणूक लढवायची की नाही, हे तो आणि शिवसैनिक ठरवतील. त्याबाबत माझे त्याच्यावर कोणतेही बंधन नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन उद्धव यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढणार, अशी जोरदार चर्चा प्रसिद्धी माध्यमांमधून दोन दिवसांपासून होती. त्यावर, आदित्य यावेळी लढणार नाहीत, असे सांगत उद्धव यांनी भविष्यात त्यांच्या लढण्याबाबतची शक्यता कायम ठेवली.राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा काँग्रेसला न सोडल्याने सुजय यांनी भाजपात प्रवेश करीत उमेदवारी मिळविली. त्यावर, ‘आपल्या मुलांचा हट्ट ज्याचा त्याने पुरवावा, दुसऱ्याच्या मुलांचा हट्ट मी का पुरवू,’ असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यावर पवार यांना त्यांनी चिमटा काढला. उद्धव म्हणाले, मी माझ्यासोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी वापरायची असतात, असा आमचा विचार नाही. शिवसेना सर्वसामान्यांसाठीच आहे. युतीच्या प्रचाराची रणनीती काल रात्री ठरली आहे. कुठेही दगाफटका होणार नाही. ते म्हणाले की, आधी स्वत: लढण्याची घोषणा करणे आणि नंतर माघार घेत, मावळमधून नातवाला पुढे करणे हे जे काही चालले आहे, ते पवारनीतीला धरूनच आहे. आम्ही बोलतो ते करतो, ते बोलतात, त्याच्या उलट करतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना