शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 21:07 IST

Maharashtra Local Self Government Election: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर  होणार आहेत. या निवडणुकांसाठी आरक्षण आणि इतर प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर  होणार आहेत. या निवडणुकांसाठी आरक्षण आणि इतर प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये २  स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहेत. त्यात ते म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी दिले आहे. दरम्यान, आता बावनकुळे यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय़ घेतला तर काही राजकीय कार्यकर्त्यांना निवडणूक न लढवता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून, विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सदर अधिनियमातील तरतुदींनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते. परंतु सध्याच्या धोरणानुसार या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे, राज्य शासनाने सदर अधिनियमानुसार सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी ०५ (पाच) व पंचायत समितीसाठी ०२ (दोन) स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी, अशी नम्र विनंती आहे,

यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल. आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देण्याकामी उपरोक्त सुधारणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, असे बावनकुळे यांनी या पत्रात म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Activists to Become ZP, Panchayat Members Without Elections? Bawankule's Letter to CM

Web Summary : Chandrashekhar Bawankule requests CM to appoint five members to Zilla Parishad and two to Panchayat Samiti. This provides opportunities for activists unable to contest elections to participate in development and enhance local governance.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस