शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:49 IST

प्रसाद लाड यांच्या ऑफरवर जरांगे पाटलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. फडणवीसांवर झालेल्या टीकेनंतर भाजपकडून आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना जरांगे पाटील यांच्यावर पलटवार केला. त्यानंतर आता जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून प्रसाद लाड यांनी तर त्यांना थेट आमदारकीची ऑफर देऊन टाकली. या ऑफरवर जरांगे पाटलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला आहे.

प्रसाद लाड यांच्या ऑफरवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "एकीकडे ते मला दादा म्हणतात, भाऊ म्हणतात. आम्हीही त्यांना दादा, भाऊ म्हणतो. पण आता ते लगेच मला मॅनेज करायला लागले आहेत. शेवटी त्यांनी फोडोफोडीचे संस्कार घेतलेच. राजकारण या खऱ्या जातीवर आता ते आले आहेत," अशा शब्दांत जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

मनोद जरांगे यांच्यावर टीका करताना प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं की, "सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली. गोरगरीब कुटुंबाला महिन्याला दीड ते ३ हजार मिळत असतील तर त्याला मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला पाहिजे, विरोधकांच्या छत्रीखाली जाऊन टीका करू नये. मनोज जरांगेंनी समाजकारणात राजकारण आणू नये. विरोधकाची भूमिका घेऊ नये. जर त्यांना राजकारण करायचं असेल मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या. मनोज जरांगेनी राजकारणात यावं, आमदार व्हावं. तसंच आणखी एका सहकाऱ्याला सोबत घेत आमदार करावं. विधान परिषदेत त्यांची भूमिका मांडावी. आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू. पण मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर  टीका करायची हे योग्य नाही. चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू. मराठा आरक्षणासाठी आम्ही नक्कीच तुमच्यामागे आहोत," असं आमदार लाड यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण