शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 4:06 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळांच्या खर्चाच्या अहवालात गैरव्यवहार करून बोगस बिले सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रसिद्ध केले होते.

धनाजी कांबळे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळांच्या खर्चाच्या अहवालात गैरव्यवहार करून बोगस बिले सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत ‘बार्टी’चे आॅडीट करण्यात येत असून, महासंचालक राजेश ढाबरे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.‘बार्टी’तर्फे राबविण्यात येत असलेल्या समतादूत प्रकल्पांसह विविध प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याची कुणकुण लागल्यानंतर समतादूत संघर्ष समितीने माहिती मागविली. त्यातून गैरकारभार चव्हाट्यावर आला. महासंचालक राजेश ढाबरे, प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, निबंधक सविता नलावडे, स्वीय सहायक गौरव निकम यांच्या चौकशीची मागणी समितीने केली होती. याची दखल घेत महासंचालक ढाबरे यांची चौकशीचे आदेश सामाजिक न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी प्र. वि. देशमुख यांनी समाजकल्याण आयुक्तांना दिले आहेत.विभागीय प्रकल्प अधिकारी गंगाधर गायकवाड यांनी माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळेची बोगस बिले मंजूर केल्याचे माहिती अधिकारात समोर आले असून, त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी केली आहे.‘बार्टी’चे महासंचालक आणि संबंधित अधिकाºयांची लवकरच चौकशी करून शासनास अभिप्रायासह अहवाल दिला जाईल.- मिलिंद शंभरकर,आयुक्त, समाजकल्याण विभागसामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी लक्ष घालावेसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या बार्टीचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे हे देखील पुण्याचे असल्याने त्यांनी बार्टीतील गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.