शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

सीएसटीवर लवकरच वायफाय

By admin | Updated: April 1, 2015 04:16 IST

लाखोंच्या संख्येने सीएसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आपल्या मोबाइलवरील इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा आणि मोफत मिळावे, या

मुंबई : लाखोंच्या संख्येने सीएसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आपल्या मोबाइलवरील इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा आणि मोफत मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. याची सीएसटी स्थानकात सध्या चाचणी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा प्रवाशांच्या मोबाइलवर उपलब्ध होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर वायफाय सुविधा अर्धा तास फ्री मिळणार आहे. सध्या मोबाइल अ‍ॅपचा काळ असून, अनेकांच्या हाती मोठमोठ्या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन असतात. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लाखोंच्या संख्येने वावरणारे प्रवासीही अँड्रॉइड फोन हाताळताना दिसतात. या फोनमध्ये असणारी इंटरनेट सुविधा ही प्रवाशांसाठी सोयीची ठरते आणि त्याचा वापरही अधिक होताना दिसतो. परंतु स्थानकांवर किंवा लोकलमध्ये नसलेल्या वायफाय सुविधेमुळे कधी कधी इंटरनेट कनेक्शनमध्येही समस्या निर्माण होते. हे पाहता प्रवाशांना इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा मिळावे आणि तेही मोफत, यासाठी सीएसटीसारख्या गर्दीच्या स्थानकावर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय झाला आहे. रेल्वेकडून वायफाय कनेक्शनसाठी लागणारे राऊटर्स बसविण्यात आले आहेत. या राऊटर्सची संख्या जवळपास २५ असल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात हे राऊटर्स बसविण्यात आले असून, त्यानंतर त्याची चाचणी सुरू करण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच वायफाय सुविधा प्रवाशांच्या सेवेत येईल, असे सांगण्यात आले. पहिल्या अर्ध्या तासासाठी ही सेवा प्रवाशांना मोफत मिळेल आणि त्यानंतर शुल्क आकारणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वायफायच्या वापरासाठी शुल्क आकारणी करतानाच २५ रुपयांपुढील किमतीची कूपन्सही विकली जातील. दिल्लीतील रेल्वे स्थानकावर १५ मिनिटेच वायफाय फ्री मिळते. त्यापेक्षा जास्त वेळ फ्री वायफाय सीएसटी स्थानकावर प्रवाशांना दिले जाईल. ही वायफाय सुविधा रेल नेटमार्फत दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)