मोर्शी (अमरावती): पतीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यामुळे पतीवियोग सहन न होऊन अवघ्या पाच तासांत पत्नीचाही हृदयाघातानेच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी मध्यरात्री मोर्शी शहरात घडली. सुरेश लखुजी शिवणकर (६२) व कांताबाई (६०) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.शहरातील दूध-ब्रेड विक्रेता सुरेश शिवणकर यांना चार दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान मंगळवारी सायंकाळी ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. रात्री १० च्या सुमारास मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. पती निधनामुळे कांताबार्इंना मोठा धक्का बसला. पतीवियोग अनावर होऊन त्याच रात्री १२ च्या सुमारास कांताबार्इंनीही देह ठेवला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)
पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू
By admin | Updated: April 6, 2017 05:16 IST