शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांची 'ही' सवय अजिबात आवडत नाही; पत्नी सुनेत्रा पवार यांची प्रेमळ नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:52 IST

वेळ मिळाल्यावर अजितदादांना कुटुंबासोबत कुठे फिरायला जायला आवडते? पत्नी सुनेत्रा पवारांनी सांगितले.

पुणे - मागील काही दिवसांपासून राजकारणाऱ्या केंद्रबिंदू असलेले अजित पवार यांच्याविषयी सातत्याने विविध चर्चा होत असतात. अजित पवार भाजपात जाणार अशा बातम्याही झळकल्या. परंतु स्वत: अजितदादांनी या चर्चेला स्पष्ट शब्दात नकार देत जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करणार असल्याचे म्हटलं. अजित पवार हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. पण हेच अजितदादा घरीही तसेच असतात का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

याचबाबत एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त असतात. अत्यंत कमी वेळ ते घरात असतात. पण कधी आमच्यासाठी नॉट रिचेबल नसतात. अनेकदा ते घरी फोन करतात किंवा मला वाटले बोलावे तर त्यांच्याशी फोनवर बोलणे होते. मी माहेरी राजकारण पाहिले होते. पण सासरी जबाबदारी आणि अपेक्षा असतात. त्या आव्हानांना पेलत इथपर्यंत आलोय. घरात काही किरकोळ वाद झाले तरी त्यात अंतिम शब्द अजितदादांचाच असतो असं त्यांनी म्हटलं. 

अजितदादांची 'ही' सवय अजिबात आवडत नाहीअजित पवार सातत्याने गर्दीच्या गराड्यात असतात. त्यात प्रत्येक माणसाच्या कामाचा निपटारा झाल्याशिवाय ते जेवत नाहीत. स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे हे कळत नाही. ५० लोकांना बोलावले तर ५०० लोक भेटायला येतात. लोकांना नाही म्हणणं हे अजितदादांना जमत नाही. त्यामुळे आपोआप उशीर होतो. वेळेवर न जेवणे हे मला आवडत नाही. वेळेवर सर्व गोष्टी केल्या पाहिजेत हा माझा हट्ट असतो. कधी कधी ऐकतात अशी प्रेमळ नाराजी पत्नी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. 

महिला सक्षमपणे बदल घडवू शकतातशरद पवारसाहेबांनीच महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. महिला अनेक पदावर काम करतायेत. सरपंचपदापासून अनेक मोठ्या पदावर महिला काम करतात. जर वातावरण चांगले असेल तर महिला सक्षमपणे काम करू शकतात. बदल घडवू शकतात असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

अजितदादांना आवडते जंगलसफारीजेव्हा वेळ देणे शक्य असते तेव्हा अजित पवार कुटुंबासोबत फिरायला जातात. अजितदादांना जंगलसफारी करायला आवडते. वेळ मिळतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना घेऊन ते नॅशनल पार्क किंवा परदेशात जायला आवडते. आता सध्या त्यांना वेळच मिळत नाही असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार