शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार मोदींसोबत स्टेजवर का जाणार? वंदना चव्हाण म्हणाल्या मी नाराज, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 11:12 IST

राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत.

मोदी सरकारविरोधात एकीकडे विरोधकांची मोट बांधली जात आहे. दुसरीकडे शरद पवारांचा उभा पक्षच भाजपाने फोडला आहे. असे असतानाही राजकीय वैर बाजुला ठेवून शरद पवारांनी पुन्हा एकदा वाट वाकडी करण्याचे धैर्य दाखविले आहे. यातून वेगळा संदेश जाईल अशी भीती विरोधकांना वाटू लागली आहे. परंतू, पवार उद्या पुण्यातील टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला जाणारच आहेत. 

यावर राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. परंतू, त्यांनी यामागे कारणही सांगितले आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु याबाबत रोहित टिळक यांनी शरद पवार हे या कार्यक्रमाला हजर राहतील असे स्पष्ट केले आहे. 

मोदी-पवार हे व्यासपीठावरून काय भाषणे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील. टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. 

वंदना चव्हाण काय म्हणाल्या...मला वैयक्तिक दृष्ट्या शरद पवारांच्या या निर्णयावर नाराज आहे. पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे मला वाटतेय. परंतू, शरद पवारांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. टिळक ट्रस्टने पवारांना तशी विनंती केली होती. अजित पवार वेगळे होण्यापूर्वी शरद पवारांनी मोदींना आमंत्रित केले होते, असे वंदना चव्हाण म्हणाल्या.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीVandana Chavanवंदना चव्हाण