शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून नरकचतुर्दशीला पायाखाली कारिटं फोडतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 11:27 IST

काही ठिकाणी अंघोळीआधी तर काही ठिकाणी अंघोळीनंतर पायानं कारिटं ठेचलं जातं. त्यालाही एक कारण आहे.

ठळक मुद्देया फळाला विविध नावं आहेत. काही ठिकाणी त्याला कर्टुले तर काही ठिकणी चिराटं म्हणतातकाकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो.चिराटं फोडण्यामागे एक वैज्ञानिक कारणही दिलं जाते

श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून आपण आश्विन महिन्याच्या चौदाव्या दिवशी नरकचतुर्दशी साजरी करतो. यादिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की पहाटे आकाशात तारे दिसतात तोवर अंघोळ करणे गरजेचं असतं. याचदिवशी आपण अंघोळीनंतर पायाच्या अंगठ्याने कारीटं (हिरव्या रंगांचं कडू फळ) फोडतो. पण तुम्हाला माहितेय का आपण असे का करतो.

नरकासुर नावाच्या एका असूर राजाची भगवान श्रीकृष्णाच्या काळात मोठी दहशत होती. तो इतरांना फार त्रास देत असे. स्त्रियांशी वाईट वागत असे. त्यामुळे जनता त्याला फार त्रासली होती. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा त्याने सत्यभामेसह त्या असूरी राजावर आक्रमण केलं आणि त्याचा वध केला. त्याच्या वधाचं प्रतिक म्हणून आपण हे कडू फळ फोडतो. आणि त्याचा रस जिभेला लावतो. याबाबत असं सांगण्यात येतं की, ‘ते फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकात्मक नरकासूराचा वध करतो. शिवाय दुसरी वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की, अश्विन महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या काळात हिवाळा सुरू झालेला असतो. फार थंडी असतो. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ चाखलं जातं.'

कारीटे फोडण्याची ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात नाही. काहीच ठिकाणी या प्रथेचं पालन केलं जातं. शिवाय काही ठिकाणी हे कारिटे अंघोळीनंतर ठेचतात. तर काही ठिकाणी अंघोळीआधी कारिटे ठेचले जातात, कारण या फळाला एक उग्र वास असतो. त्यामुळे अंघोळीआधी कारिटे ठेचून त्यानंतर अंघोळ केली जाते.

त्याचप्रमाणे या कारिटेला विविध नावेही आहेत. काही ठिकाणी या फळाला कर्टुले म्हणतात. तर काही ठिकाणी चिराटे म्हणतात. कारिटे हे अनेकवचनी असून कारीट हे एकवचनी नाव आहे. कारीटं हे कोकणात आढळणारे रानवेलीवर येणारं फळ आहे. हे फळ वेलीला लागते जे एकदम काकडीच्या वेलीसारखे दिसते. काकडीच्या फुलांसारखीच याचीही फले पिवळ्या रंगाची असतात. अगदी काकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो. आतल्या बिया काकडीच्या बियांसारख्या असतात पण थोड्या आखूड असतात.

टॅग्स :diwaliदिवाळीIndian Traditionsभारतीय परंपरा