शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र पोर्टल असताना एमपीएससी कशाला? ३७ हजार रिक्त जागा भरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:09 IST

शिक्षण महामंडळ; ३७ हजार रिक्त जागा भरा

लोकमत न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : शिक्षकांच्या ३७ हजार रिक्त जागा भरा अशी मागणी करत पवित्र पोर्टलची अंमलबजावणी पूर्ण झालेली नसताना एमपीएससीद्वारे शिक्षक भरतीचा अट्टाहास का, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने केला आहे. एमपीएससीमार्फत होणारी भरती वेळखाऊ ठरेल. त्यामुळे तत्काळ पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांना संधी द्या, अशी मागणीही शिक्षण महामंडळाने पत्रकार परिषदेत रविवारी केली. 

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चार महिन्यातून एकदा घ्यायची होती. पण चार वर्षात एकदा परीक्षा झाली. त्यातून सहा हजार जिल्हा परिषद आणि २ हजार खासगी शिक्षक भरले गेले. ५ वर्षांपासून भरती बंद आहे. ८० टक्के शिक्षण खासगी शिक्षण संस्थांमार्फत दिले जाते. या संस्थांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. कर्नाटकात १५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक आहे. राज्यात विद्यार्थी असताना अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न शासनाकडून निर्माण केला जात आहे, असे महामंडळाचे सरचिटणीस विजय गव्हाणे म्हणाले.  पश्चिम बंगाल, कर्नाटकात एमपीएससीचा प्रयत्न केला तो न्यायालयात टिकला नाही. काही राज्यात पवित्र पोर्टलचा प्रयत्न झाला तो फसला. त्यामुळे वेळ वाया न घालवता भरती लवकर होणे गरजेचे असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. एमपीएससीद्वारे भरती प्रक्रियेस राज्य शिक्षण संस्था चालकांचा विरोध असणार आहे. पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना शासनाने सेवेत कायम करण्याची मागणी माजी आमदार विजय गव्हाणे, एस. पी.जवळकर, मिलिंद पाटील यांनी केली आहे.

भरती घोटाळे ताजे राज्यात एमपीएससीमार्फत वर्ग १, वर्ग २च्या परीक्षा घेऊन मोठ्या विश्वासाने भरती केली जाते. परंतु, राज्यात शिक्षण, आरोग्य, पोलीस क्षेत्रात भरतीमध्ये घोटाळ्यांचे सत्र सुरू आहे. टीईटीमधील घोटाळा संपलेला नाही. अशात शिक्षक भरतीत पुन्हा गैरप्रकार झाल्यास एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे सुरासे म्हणाले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMumbaiमुंबई