शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

हर्षवर्धन जाधव कशामुळं घेतायत शिवसेनेशी पंगा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:59 AM

लोकसभा निवडणुकीनंतर खैरेंकडून मी वडिलांना मारल्याचा आरोप केला गेला. त्यावेळी मी प्रतिकार केला नाही. परंतु, आता हे मला सतत मुसलमानाची औलाद म्हणत असतील तर मी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.

मुंबई - आक्रमक आणि बंडखोर वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना परिचीत झालेले हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकसभेला शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर शिवसेना आमदार असताना आव्हान उभं करणाऱ्या हर्षवर्धन यांनी सेनेला पुन्हा एकदा शिंगावर घेतले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शक्तीस्थानावरच हल्ला चढवला. त्यामुळे औरंगाबादेतील शिवसेना नेते आक्रमक झाले आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना असा प्रवास करून आलेले हर्षवर्धन जाधव मराठा क्रांती मोर्चात राजीनामा देऊन चर्चेत आले होते. त्याच काळात त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. त्यानंतर लोकसभा निवडणूकही लढवली. या निवडणुकीत त्यांनी लक्षवेधी मते घेतली. त्यामुळे खैरेंना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून शिवसेना आणि हर्षवर्धन जाधव आमने-सामने येण्यास सुरुवात झाली.

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सासरे रावसाहेब दानवे यांचं पाठबळ असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. परंतु, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत दानवे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना-हर्षवर्धन समोरासमोर आले आहेत.

प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना जागा दाखवा असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. यावेळी त्यांचा रोख जाधव यांच्यावरच होता. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून उमेदवारी देण्याची खेळी केली. हाच धागा पकडत जाधव यांनी सत्तार तुमच्या ...... लागतो का ? असा प्रश्न उपस्थित केला.

अश्लील प्रश्नामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून शिवसेना नेत्यांकडून जाधव यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणावर जाधव दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकतील, अस वाटत असताना हर्षवर्धन पुन्हा आक्रमक झाले आहे. तसेच शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत औरंगाबादमध्ये तरी शिवसेना-हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढाई आरपारची होणार असं चित्र आहे.

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पित्याला मारलं, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. याला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी सेनेवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर खैरेंकडून मी वडिलांना मारल्याचा आरोप केला गेला. त्यावेळी मी प्रतिकार केला नाही. परंतु, आता हे मला सतत मुसलमानाची औलाद म्हणत असतील तर मी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेला दे धक्का !लोकसभा निवडणुकीत शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी लक्षवेधी मते घेऊन सर्वांनाच धक्का दिला. किंबहुना वंचित फॅक्टर नसता तर जाधव यांचा विजय झाला असता असंही सांगण्यात येते. मात्र त्यांची ती संधी हुकली. विषेश म्हणजे भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याचे आरोपही झाले होते. एकंदरीत खासदारांचा पाडाव झाल्यामुळे मराठवाड्यातील शिसेनेच्या गडाला धक्का बसला आहे. हाच जाधव यांच्यासह भाजपचा अजेंडा होता, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती.