शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना डावलत शिंदेसेनेने ज्योती वाघमारेंना राज्यसभेची संधी का दिली? Inside Story समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:35 IST

Jyoti Waghmare Shiv Sena Shinde Group News: पक्षातील अनेक दिग्गज इच्छूक असताना शिंदेसेनेने ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला.

Jyoti Waghmare Shiv Sena Shinde Group News: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पक्षातील अनुभवी, बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच, डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेचे तिकीट जाहीर केले. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या व सोलापूरच्या रस्त्यावर अनवाणी पायाने गल्लोगल्ली फिरणाऱ्या, अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आपल्या वक्तृत्वाने अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. 

सोलापूरतून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत असताना दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक लढा जिवंत ठेवला होता. हाच वारसा घेऊन ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली. पाच भाषांवरील प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यास ही त्यांची मुख्य ओळख आहे.

लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली आहे

नेमका वेळेला, नेमका विचार म्हणजे एकनाथ शिंदे. आम्ही मानसिक आणि राजकीय बळ ज्योती वाघमारे यांना दिले आहे. सर्वसामान्य शिवसैनिक जी एका छोट्या गावातून येते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही. पण, त्यांनी सभा गाजवल्या. शिवसेनेत येऊन मेहनत घेतली. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून निर्णय घेण्यात आला. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे माझी लाडकी बहीण म्हणतात. लाडक्या बहिणीला उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. एकनाथ शिंदे सगळ्यांना सामावून घेतात. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी एकनाथ शिंदे दूर करतील, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांत टीव्हीवरील चर्चासत्रे असोत किंवा दसरा मेळाव्यातील भाषणे, डॉ. वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केले आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारा चेहरा म्हणून त्या पक्षात ओळखल्या जातात. आता हीच आक्रमकता त्या दिल्लीच्या संसदेत कशी गाजवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Why Shinde Sena favored Jyoti Waghmare for Rajya Sabha seat?

Web Summary : Shinde favored Waghmare, surprising many. Her humble background and strong oratory skills impressed. Waghmare, from a poor family, holds a PhD in English and is known for her sharp criticism of the Thackeray group.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाट