शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:26 IST

Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम-दादर मतदारसंघच का निवडला? असा प्रश्न अनेकांना आहे. यावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच भाष्य केले आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षही उतरला आहे. महत्वाचे म्हणजे, खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेमाहीम-दादर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम-दादर मतदारसंघच का निवडला? असा प्रश्न अनेकांना आहे. यावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच भाष्य केले आहे. 

राज ठाकरे म्हणाले, "मनसे नेत्यांची एक बैठक झाली होती. त्यात आपण उपस्थित नव्हतो. यावेळी नेतेमंडळी म्हणाले, सर्वांनीच निवडणूक लढायला हवी. तेथे अमित म्हणाला, प्रत्येकाने निवडणूक लढायला हवी. पक्षाने मीही निवडणूक लढेन. याच्या बातम्या आल्या. मात्र, मी तेव्हा गांभीर्याने घेतले नाही. यानंतर आपल्या एका बैठकीत समोरून काही नेते म्हणाले की, अमित ठाकरे यांना भांडुपमधून उभे करूया. यानंतर हे मी गांभीर्याने घेतले आणि मी रात्री अमितसोबत बोललो. मी त्याला विचारले की, या ज्या चर्चा सुरू आहेत, निवडणूक लढवण्यासाठी तू सेरिअस आहेस? यावर तो म्हणाला आपल्याला वाटत असेल त लढेन, नसेल वाट तर नाही लढणार. पण मला वाटते की पक्षाच्या सर्व लोकांनी निवडणूक लढायला हवी. यानंतर, भांडुपपेक्षा माहीम-दादर मतदारसंघातून निवडणूक लढवणे योग्य असल्याची चर्चेतून समोर आले." राज ठाकरे एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

माहिम सीटवर कशी आहे तयारी?राज ठाकरे पुढे म्हणाले, यानंतर, आमचे जे नितिन सरदेसाई आहेत, मी त्यांना या जागेसाठी एक वर्षापूर्वीच तयारी करण्यास सांगितले होते. आता मलाच समजे ना की, मी तर त्यांना सांगितले आहे की, कामाला लागून जाता आणि आता याला उभे करायचे आहे. त्यांच्या सोबत काय बोलू? कारण आमचे केवळ राजकीयच नाही तर कौटुंबीक संबंधही आहेत. तर हे सर्व होता होता, सर्वांनी निर्णय घेतला की, अमितला उभे करायचे आहे आणि तेथून हे सर्व सुरू झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेmahim-acमाहीम