शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:17 IST

देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. - संजय राऊत

महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू, महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या राज्याला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. योजना बंद करण्याचे सुडाचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले होते, आम्ही त्याच्यामध्ये नाही आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही, अशी टीका ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व घाशीराम कोतवाल आहेत तीन, असा आरोपही राऊत यांनी केला. आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशी त्यांना भीती का वाटत आहे? राज्य जाईल ही त्यांची भीती आहे. हरतो आहोत ही त्यांची भिती आहे, म्हणून फडणवीस धमक्या देत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. 

नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नाव बदलून काँग्रेसच्या योजना चालवलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी काहीही केले नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षानुवर्ष व गरिबांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्याय बाबतीत या सगळ्या योजना त्यांनी फक्त नाव बदलली. संस्थांची योजनांची इमारतींची आणि त्या चालू केल्या, योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे. फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. ज्या प्रकारचे दळभद्री आणि डर्टी पॉलिटिक्स त्यांनी सुरू केले त्याचा अंत आता जवळ आला आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला. 

नरेंद्र मोदींवर राऊतांची टीकानरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र येऊ शकत नाही . झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही. ते वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहेत खोटारडे कुठले लोकांना मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे, अशी टीका राऊत यांनी मोदींवर केली. 

लाडकी बहीण योजना हा सत्ताधाऱ्यांसाठी टर्निंग पॉईंट नाही असे राऊत म्हणाले. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी यापूर्वी आलेल्या आहेत. ते काही दीड हजार रुपये काही खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला पैसा आहे या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आमचे सरकार येईल तेव्हा पंधराशे ऐवजी आम्ही 3000 करू हा आमचा शब्द आहे, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस