शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 07:22 IST

आठवडाभरात पक्षासंदर्भात कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले. 

मुंबई : आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू आहे. १३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीची तारीख असून या पार्श्वभूमीवर आता शिवसेना कुणाची, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस पाठविली आहे. आठवडाभरात पक्षासंदर्भात कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले. 

स्थानिक पातळीवर किती आमदार, खासदार व अन्य पदाधिकारी आहेत यासह अन्य पुराव्यांची कागदपत्रे दोन्ही गटांना विधानसभा सचिवांकडे जमा करावी लागणार आहेत.

कधी सुनावणी- विधानसभा अध्यक्षांनी १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरपर्यंतच्या  वेळापत्रकात शिवसेना कुणाची? याबाबतच्या सुनावणीचा कोणताही उल्लेख नाही. - त्यामुळे आता यावर नेमकी कधी सुनावणी होणार आणि त्याचा निकाल काय येणार ही उत्सुकता ताणली गेली आहे.

राष्ट्रवादी व शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी एकत्रच- अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. 

- या याचिकेसोबतच शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचीही एकत्र सुनावणी शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी करण्याचा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने घेतला. शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी सुनावणी बुधवारी होणार आहे.  

दबावासाठी... -- ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी पुन्हा प्रतिक्रिया दिली. - सभागृहाबाहेर केलेल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही. जे लोक आरोप करत आहेत, हे आरोप केवळ निर्णयप्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVidhan Bhavanविधान भवनUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे