शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?

By अतुल कुलकर्णी | Updated: December 28, 2025 10:17 IST

...हा समज घेऊन आम्ही बाहेर कोणाशी बोलायला जावे तर कोणाच्या तंगड्या कोणाच्या गळ्यात हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही जरा विस्कटून सांगितले तर बरे होईल असे म्हणत आम्ही काही लोकांशी संवाद साधला. त्यावरून तुम्हाला काही समजले तर आम्हाला समजावून सांगा... तो संवाद जशास तसा इथे देत आहे...

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

नेतेमंडळी, नमस्कार...राज्यात भाजप, शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि अन्य पक्ष विरोधात आहेत, असा आमचा समज आहे. हा समज घेऊन आम्ही बाहेर कोणाशी बोलायला जावे तर कोणाच्या तंगड्या कोणाच्या गळ्यात हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही जरा विस्कटून सांगितले तर बरे होईल असे म्हणत आम्ही काही लोकांशी संवाद साधला. त्यावरून तुम्हाला काही समजले तर आम्हाला समजावून सांगा... तो संवाद जशास तसा इथे देत आहे...

- दिनकरराव, दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये तुम्ही जोरजोरात ढोल वाजवून राज आणि उद्धव एकत्र आल्याचे स्वागत करत होता. मनसे आता भाजपचा सुपडा साफ करेल असे म्हणत होतात तुम्ही... आणि दुसऱ्या दिवशी सांगता मी भाजपसोबत आहे..!हो पण ती कालची गोष्ट होती. आज मी भाजपसोबत आहे. आता मनसेचा सुपडा साफ करू.- पण परवा तर तुम्ही भाजपला पक्ष फोडणारा, माणसं फोडणारा, घर तोडणारा पक्ष असं म्हणत होता. आज एकदम उपरती कशी झाली..?माझा विकास करायचा असेल तर तो भाजपमध्येच होऊ शकतो, असे स्वप्न मला पहाटे पडले. मी खडबडून जागा झालो. मला मागचे काही विचारू नका. आज मी भाजपसोबत आहे..!- म्हणजे उद्या तुम्ही कोणासोबत असाल..? उद्या स्वप्नात उद्धव ठाकरे आले तर...?स्वप्न कसे पडते त्यावर अवलंबून आहे. जर ते माझा विकास करतो म्हणाले तर मी उद्या त्यांच्यासोबत जाऊ शकतो..?- अहो पण ज्या लोकांनी तुमच्याकडे आणि तुमच्या पक्षाकडे बघून मतदान केले असेल ना...मतदान केले की त्यांचे काम संपले. त्यांनी जास्त आगाऊपणा करायचा नाही. वाजव रे ढोल... (ढोलच्या तालावर गुटगुटीत दिनकरराव मस्त नाचू लागतात)

- दादा, पुण्यातले आपल्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते भाजपसोबत नाहीत का..?मला काही माहिती नाही... सुप्रियाला विचारा... ती काकांशी बोलून सांगेल...- पण दादा पक्ष तर तुमचा आहे ना..? काका-पुतणे एकत्र येणार अशा बातम्या छापून येत आहेत.

त्या मीडियावाल्यांना नाहीत कामधंदे... - असे म्हणून प्रश्न सुटेल का दादा... आपला पक्ष नेमका कोणासोबत आहे? काका-पुतणे एकत्र येणार आणि भाजपविरोधात निवडणूक लढवणार अशी अख्ख्या पुण्यात चर्चा आहे.चर्चा तर होणारच... नाहीतरी पुण्यातल्या लोकांना चर्चा करायला फार आवडते.

- पण दादा तुम्ही सत्तेमध्ये भाजपसोबत आहात. निवडणुकीत भाजपच्या विरोधात कसे..? तुम्ही तरी जरा विस्कटून सांगा...तुम्हाला सांगायला आम्ही बांधील नाही. आमचं काय करायचं आम्ही बघू... आम्ही पण दानवांना उत्तर द्यायला बांधील नाहीत. जे बोलायचे ते ‘देवा’ला बोलू...

- साहेब, हा आपला हाडाचा कार्यकर्ता आहे... त्याला तिकीट दिले पाहिजे असे वाटत नाही का..?न वाटायला काय झाले. त्याला गुवाहाटीला जायचे विमानाचे तिकीट देतो. खुश होईल तो...

- पण साहेब त्याला नगरसेवकापदाचे तिकीट पाहिजे. एकदा का तिकीट मिळाले की तोदेखील स्वबळावर अनेकांना गुवाहाटीची तिकिटे काढून देईल की...

बिलकुल नाही. सध्या आपल्या पक्षाच्या महामंत्र्यांच्या बायकोला, खासदाराच्या भावाला, आमदाराच्या पोराला तिकीट द्यायचे आहे. नगरपरिषदेला वामनरावच्या घरात आपण सहा जणांना तिकिटे दिली. तसेच आता आपल्या प्रत्येक नेत्याच्या घरात नातेवाइकांना तिकिटे द्यायची आहेत...

- पण मग कार्यकर्त्यांनी काय करायचे...? सतरंजी उचलणाऱ्यांची पार्टी असा नवीन पक्ष काढला तर...?हा हा हा... पार्टी काढायला पैसे लागतात. ती चालवायला पैसे वाटावे लागतात... ते तर फक्त माझ्याकडेच आहेत... ते फक्त मीच करू शकतो...

- ही सगळी चर्चा ऐकून, आम्ही चहाच्या टपरीवर गेलो... त्यावेळी तेथे आरती प्रभूंचे गाणे सुरू होते... गाणे ऐकता ऐकता आम्ही ढसाढसा रडू लागलो... ५० वर्षांनंतर तंताेतंत खरे ठरेल, असे गाणे आरती प्रभूंना १९७३-७४ मध्ये कसे सुचले असेल या विचारानेच आम्ही अचंबित झालो... रेडिओवरचे गाणे आमचे काळीज पिळवटून टाकत होते...कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?कशासाठी उतरावे तंबू ठोकूनकोण मेले कोणासाठी रक्त ओकूनजगतात येथे कुणी मनात कुजूनतरी कसे फुलतात गुलाब हे ताजेदीप सारे जाती येथे विरून विझूनवृक्ष जाती अंधारात गोठून झडूनजीवनाशी घेती पैजा घोकून घोकूनम्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजेअंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधीवेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधीदेई कोण हळी त्याचा पडे बळी आधीहारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे...- तुमचाच, बाबूराव

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Political Satire: Shifting Allegiances, Empty Promises, and Public Disillusionment.

Web Summary : Political satire reveals Maharashtra's shifting alliances, leaders prioritizing personal gain over voter interests. Empty promises and nepotism fuel public disillusionment, echoing timeless truths about power.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रMunicipal Corporationनगर पालिका