शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:54 IST

दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.

ठळक मुद्देजो डर गया, समझो वो भाजप में गया, सोशल मीडियावर खिल्लीपावसाळ्यात आमदारांच्याच उड्या जास्त

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसमधील आजी-माजी आमदारांना पक्षात घेऊन पवित्र करण्याचा धडाका भाजपने लावला असून, त्याबद्दल समाजात व सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झडत आहेत. मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड जास्त होत असून, आज कोण गळाला लागले, अशी चर्चा रोज होत आहे. त्यावर सोशल मीडियावर अत्यंत मिश्किल व तितकीच खोचक टीकाटिप्पणी केली जात आहे. यंदा पावसाळ्यात बेडकांपेक्षा आमदारच इकडून तिकडे जास्त उड्या मारत आहेत, असाही चिमटा एकाने काढला आहे.राज्यात सध्या भाजप-शिवसेनेचेच सरकार सत्तेत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातही भाजपची हवा निर्माण झाली आहे. भाजप-शिवसेना युती स्वत:च्या ताकदीवर पुन्हा सत्तेत येईल, असे वातावरण असताना या दोन्ही पक्षांकडून दोन्ही काँग्रेसमधील आमदारांपासून ते अगदी तिसऱ्या चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही पक्षांत घेतले जात आहे. त्यावर टिप्पणी करताना ‘जो डर गया... समझो वो भाजप में गया...!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने ‘पक्ष बदलण्याची अंतिम तारीख’ही ठरवून द्यावी, अशी सूचना एका बहाद्दराने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी ‘मेगाभरती’ करण्याचे जाहीर केले होते. त्याचा संदर्भ देत ‘तरीच मुख्यमंत्रीसाहेब बोलले होते, आम्ही निवडणुकीपूर्वी मेगाभरती घेऊ. आम्ही येडे नोकरीची समजलो... हे तर पक्षांतर हाय..!!’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. साठ वर्षांनंतर जे काँग्रेसचे झाले, ते बहुधा ही मंडळी भाजपमध्ये जाऊन त्यांची काँग्रेस करणार, अशीही भीती एकाने व्यक्त केली आहे.

  • दरवाजावर टकटक झाली.

आहेत का आमदारसाहेब घरात ?नाही; बाहेर गेलेत.कधी येणारेत?येतील तासाभरात.बरं, त्यांना सांगा, निमंत्रण द्यायला आलो होतो.कोण आलेलं म्हणून सांगू? बघू पत्रिका.छे छे, लग्नाचं वगैरे नाही आमंत्रण, भाजपमध्ये येण्याचं.पण तुम्ही कोण?हे ‘ईडी’वाले आणि मी ‘आयकर’वाला!अहो, साहेबच तिकडं गेलेत. तुम्ही निमंत्रण द्यायला येणार कळल्यावर.बर झालं, मग कामच झालं.

  • कमळ उगवण्यासाठी दलदल पाहिजे ना? दलदल तिथे काँग्रेस गवत उगवणारच!

निसर्गाचा नियम बाबा !!दुसरं काय !!!

  • ‘राष्ट्रवादी’तील कार्यकर्त्यांच्या बायकांचा नवीन उखाणा

सोनेरी हरणाचे फताडे-फताडे पायआमचे हे दिसत नाहीत....भाजपात गेले की काय?

  • कंडक्टर : तिकीट, तिकीट... कुठं जायचं...?

दोन भाजप द्या...!!

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर