शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 19:34 IST

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले.

खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही खुलासे केले आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांची मुलाखत असलेला भाग प्रकाशित झाला. आज फडणवीस यांनी या भागावर काही ट्विट केले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी शिफारस केली, या मागची स्टोरी सांगितली आहे. 

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याची चर्चा महाराष्ट्रात होत होती. तेव्हा खरोखच देवेंद्र फडणवीस शॉक झाले होते. परंतू, शिंदेंनी मुख्यमंत्री केले म्हणून नाही, तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केल्याबद्दल देवेंद्रना आश्चर्य वाटले होते. यामागचा गेम प्लॅन वेगळाच होता. 

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही. सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरिष्ठांना हे सांगितले. त्यांना समजावण्यात खूप वेळ गेला. माझ्या पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही, असे फडणवीस म्हणाले. 

एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते, परंतू ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतू, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार दिला, असे फडणवीस म्हणाले. 

मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी वरिष्ठांशी बोलणीही झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असे सांगितलेले. कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले. 

त्यापुढचा शॉक राज्यपालांना...राज्यपालांना या मुख्यमंत्री पदाच्या घडामोडींची कल्पनाच नव्हती. जेव्हा शिंदे आणि मी पत्र द्यायला गेलो तेव्हा आम्ही दोघे आणि वरचे तीन नेत्यांनाच हे माहिती होते. राज्यपालांना शिंदे मुख्यमंत्री बनतील असे पत्र दिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. मी त्यांना हेच ठरले असल्याचे सांगितले. यानंतर मी पीसी घेऊन शिंदेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चिंता किंवा दु:ख नव्हते. तर विजयाचा आनंद होता, परंतू तो जास्त वेळ टिकू शकला नाही, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना