शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आता कोण उरले आहे..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 18:01 IST

कोल्हापूर जिल्ह्यांत ज्यांनी काँग्रेस संपवली त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले आहेच परंतू महाराष्ट्रात तरी या पक्षात आता कोण राहिले आहे, सारे नेते सैरावैरा पळाले असल्याची टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे महायुतीच्या प्रचारसभेत केली. येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आता कोण उरले आहे..?धनंजय महाडिक यांची विचारणा : नेते सैरावैरा पळाले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यांत ज्यांनी काँग्रेस संपवली त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले आहेच परंतू महाराष्ट्रात तरी या पक्षात आता कोण राहिले आहे, सारे नेते सैरावैरा पळाले असल्याची टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे महायुतीच्या प्रचारसभेत केली. येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली.माजी खासदार महाडिक म्हणाले,‘ भाजप हा सतरा कोटी सभासद असलेला जगातला मोठा पक्ष बनला आहे आणि दुसरीकडे काँग्रेसची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. त्याचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी सध्या कुठे आहेत..? राज्यातील नेतेही गर्भगळीत झाले असून सैरावैरा पळत सुटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात या पक्षांतच आता कोण शिल्लक राहिलेले नाही. ज्यांनी लोकसभा निवडणूकीत महायुतीचा प्रचार केला, त्यांनाच जिल्ह्याचे अध्यक्षपद सोपवले गेले आहे.’कोल्हापूर दक्षिणमधील निवडणूक ही दोन पक्षांच्या कारभारावर, नीतमत्तेवर होत नसून ती द्वेषावर होत असल्याची टीका करून महाडिक म्हणाले,‘ गेल्या निवडणूकीत अमल निवडणूकीस उभे राहिले तेव्हा आम्हांला चिंता होती. कारण ते अत्यंत लाजाळू आहे. त्यांना प्रश्र्न सोडवून घ्यायला जमेल का असे वाटत होते. परंतू त्यांनी केलेली कामे पाहून माझेही डोळे पांढरे झाले आहेत.

याउलट आमचे विरोधक अमलऐवजी गोकुळचा कारभार, महाडिक कुटुंबियांवर वैयक्तिक टीका करत आहेत. ते सत्तेत असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केले हे जाहीर करावे. थेट पाईपलाईनसाठी आमदारकी पणाला लावली परंतू त्याचे पाणी आमच्या नातवंडांना तरी मिळेल का नाही अशी शंका मला वाटत आहे.’

 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकBJPभाजपाkolhapurकोल्हापूर