शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Navneet Rana Photoshoot: नवनीत राणांचे फोटो काढणारा तो पांढऱ्या शर्टातील व्यक्ती कोण? लिलावती रुग्णालय म्हणते अनोळखी..., पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 10:21 IST

Navneet Rana Photoshoot while MRI Scanning: शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वांद्रे पोलिसांत तक्रार देत, रुग्णालय प्रशासन आणि राणा यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

अनोळखी व्यक्तीकडून नवनीत राणांचे फोटोशूटरुग्णालयाचा दावा : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्या एमआरआयमधील फोटो विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत वांद्रे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर, लीलावती रुग्णालयानेही पोलिसांत धाव घेत फोटो काढणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे. रुग्णालयाच्या सुरक्षा सुपरवायझरच्या तक्रारीवरून फोटो काढणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वांद्रे पोलिसांत तक्रार देत, रुग्णालय प्रशासन आणि राणा यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी चौकशी सुरू असताना बुधवारी, लीलावती रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर अमित गौड (३८) यांच्या फिर्यादीवरून वांद्रे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

गौड यांच्या तक्रारीनुसार, ६ मे रोजी नवनीत राणा या पाठ आणि मानदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. ६ आणि ७ मे रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना एमआरआय तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार, ६ मे रोजी रात्री १० च्या सुमारास त्यांना एमआरआय कक्षात नेण्यात आले. त्यावेळी रवी राणा यांचे सुरक्षा रक्षक तसेच एक पांढरा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती उपस्थित होता. यावेळी अनोळखी व्यक्तीने कुठलीही परवानगी न घेता नवनीत राणा यांचे एमआरआयमधील ट्रॉलीवर रुग्णाची तपासणी सुरू असताना त्याचे फोटो घेतले. तसेच ते माध्यमांना देत, सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

पोलिसांकडे दिले सीसीटीव्हीचे फुटेज लीलावती रुग्णालयाची नियमावली असून, एमआरआय कक्षातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व धातूच्या वस्तू नेण्यास मनाई आहे. तसेच ठिकठिकाणी नो फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी लिहिले असल्याचे नमूद केले आहे. संबंधित फोटोग्राफीचे सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद असून ते फूटेजही पोलिसांना देण्यात आले आहेत. या तक्रारीवरून पोलिस फोटो घेणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv Senaशिवसेना