शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या रूपाला पोर्ट्रेटच नव्हे, विचारांच्या प्रतीकांमध्ये जिवंत करणारा चित्रकार कोण?

By सुमेध वाघमार | Updated: October 1, 2025 07:59 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या केवळ तीन वर्षाच्या आतच (१९५९) गुलाबराव एस. नागदेवे या अवलिया चित्रकाराने रात्रंदिवस मेहनत करून अशी तैलचित्रे साकारली, जी आज ६६ वर्षानंतरही कोट्यवधी लोकांच्या मनामध्ये विचारांचे स्फुल्लिंग चेतवत आहेत.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या केवळ तीन वर्षाच्या आतच (१९५९) गुलाबराव एस. नागदेवे या अवलिया चित्रकाराने रात्रंदिवस मेहनत करून अशी तैलचित्रे साकारली, जी आज ६६ वर्षानंतरही कोट्यवधी लोकांच्या मनामध्ये विचारांचे स्फुल्लिंग चेतवत आहेत. तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाला केवळ पोर्ट्रेटमध्ये नव्हे, तर आंबेडकरी विचारांच्या धगधगत्या प्रतिकांमध्ये त्यांनी जिवंत केले आहे. त्यांच्या कलाकृती म्हणजे केवळ रंगरेषा नसून, त्या मानवमुक्तीच्या संघर्षाची अजरामर साक्ष आहेत. स्वःता पडद्याआड राहून समाजाला एक अमूल्य ठेवा देणाऱ्या या निःस्वार्थ कलावंताची ही केवळ कला नाही, तर प्रेरणा आणि क्रांतीचा जिवंत वारसा आहे. नागदेवे यांच्या चित्राने बाबासाहेबांचे प्रभावी रूप आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.

तैलचित्र तातडीने पाठविले लंडनलानागदेवे यांनी काढलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक पोर्ट्रेट १९७० मध्ये थेट लंडनच्या 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मध्ये पोहोचले. यासाठी 'डॉ. आंबेडकर मेमोरियल कमिटी ऑफ ग्रेट ब्रिटन'ने पुढाकार घेतला.त्यावेळचे स्मारक समितीचे अध्यक्ष रा. सु. २ गवई यांच्या विनंतीवरून नागदेवेंनी पांढऱ्या सूटमधील आणि हाती संविधान असलेले पोर्ट्रेट तयार केले. हे तैलचित्र ओले असतानाही तातडीने लंडनला पाठविण्यात आले होते. या पोर्ट्रेटवर २३ ऑक्टोबर १९७० अशी तारीख असून, खाली जी. एस. नागदेवे अशी त्यांची स्वाक्षरी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Artist immortalized Babasaheb Ambedkar's ideology, not just his portrait.

Web Summary : Gulabrao Nagdeve's paintings, created shortly after Babasaheb's conversion to Buddhism, vividly portray Ambedkar's ideology. His art, including a portrait at the London School of Economics, inspires millions and exemplifies the fight for liberation. His work is a timeless legacy of revolution.
टॅग्स :nagpurनागपूर