"पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हा देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचा अपमान आहे. आपण त्या बहिणींना काय उत्तर देणार ज्यांचे कुंकू पुसले गेले? जे पाकिस्तानच्या दहशतनाद्यांनी केले. बीसीसीआयने विचार करायला हवा. भारताचे काय धोरण आहे समजत नाही." असे एआयएमआयएमचे (AIMIM) राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
पठाण, पुलवामा हल्ला, २६/११ मुंबई हल्ला, पहलगाम आणि नुकत्याच झालेल्या लाल किल्ला दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत म्हणाले, "या सर्व घटनांमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आले आहे. देश जेव्हा दहशतवादाच्या वेदना सहन करत आहे, तेव्हा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे अनाकलनीय आहे."
"ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट..." -वारिस पठाण पुढे म्हणाले, "पुलवामा आणि लाल किल्ला स्फोटात 'जैश-ए-मोहम्मद'चे नाव समोर आले आहे. ती एक पाकिस्तानी दहशतवादी संघटना आहे. आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव केले, तरीही भारत पाकिस्तानसोबत सामना खेळत आहे. ज्या बहिणींचे कुंकू पाकिस्तानने पुसले, त्यांना आपण काय उत्तर देणार? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे."
"कोण राष्ट्र विरोधी आहेत? जरनता निर्णय घेईल..."-जर आपण पाकिस्तानसोबतचे सर्व संबध तेडलेले आहेत, तर खेळायलाही नको. नाही तर स्पष्ट होते की, आपण बोलता एक आणि करता एक. मात्र देसातील जनता बघत आहे. आता आपणच मला सांगा, मी तर विरोधात बोलत आहे की, पाकिसान सोबत सामना खेळायला नको. तर कोण राष्ट्रवादी? मी की ते लोक, जे भारत-पाकिस्तान यांच्यात सामना खेळवत आहेत. कोण राष्ट्र विरोधी आहेत? जरनता निर्णय घेईल, कोण राष्ट्रविरोधी आहे? वारीस पठाण की ते लोक जे भारत-पाकिस्तान सामना खेळवत आहेत." असेही पठाण यावेळी म्हणाले. दरम्यान, केवळ काही पैशांसाठी देशाची प्रतिष्ठा पणाला लावणे चुकीचे असून, देशाच्या मान-मर्यादेपुढे अशा पैशांना काहीही किंमत नाही, असेही ते म्हणाले.
Web Summary : AIMIM's Waris Pathan opposes India-Pakistan cricket matches, deeming them disrespectful to martyrs. He questions who is truly nationalist: those opposing matches or those organizing them, citing past terror attacks.
Web Summary : एआईएमआईएम के वारिस पठान ने भारत-पाक क्रिकेट मैचों का विरोध करते हुए उन्हें शहीदों का अपमान बताया। उन्होंने सवाल किया कि राष्ट्रवादी कौन है: मैचों का विरोध करने वाले या आयोजन करने वाले, अतीत के आतंकी हमलों का हवाला देते हुए।