शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sadabhau Khot: लाल टॉमेटोसारखे गाल असलेला तो नेता कोण? सदाभाऊ खोतांनी राष्ट्रवादीवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 12:29 IST

Sadabhau Khot on Sharad Pawar, NCP: वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो ज्याने दगड मारलाय त्याचा घोट घेतो, कुत्रा दगड मारणाऱ्याला चावतो. माझ्या जिवाला पवार कुटुंबापासून धोका आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. 

राष्ट्रवादीला सांगतो बदमाश गुन्हेगाराला माझ्या अंगावर घालून कुभांड रचून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे यशस्वी होणार नाही. निश्चितपणे रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल. २१, २२ जूनला राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे. संघर्ष अटळ आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. 

गुन्हेगाराला समोर उभे करू नका, हिंमत असेल तर मैदानात समोर या, मी त्या हॉटेल मालका शिनगारेवर गुन्हा दाखल केला आहे. एक कलम लावायला हवे होते. पोलिसांनी त्या गुन्हेगाराची पाठीमागची कारकीर्द शोधावी. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे. 

यामागे लाल टॉमेटो सारखे गाल असलेला नेता कोण आहे त्याचे नाव वेळ आली की सांगेन. आजपासून त्याचे बगलबच्चे बोलायला लागतील, त्यावरून तो कोण हे समजेल. अजून काही लोक त्याठिकाणी होते. या लोकांनी मी ओळखतो. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो ज्याने दगड मारलाय त्याचा घोट घेतो, कुत्रा दगड मारणाऱ्याला चावतो. माझ्या जिवाला पवार कुटुंबापासून धोका आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी या पक्षापासून माझ्या जिवाला धोका आहे, हे मी लेखी कळवणार आहे. पवार कुटुंबाकडून धोका आहे. सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल परंतू त्यांची ही व्यवस्था, वाडा नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप केला आहे. तो हॉटेलमालक त्याला जेवढे सांगितले जायचे तेवढेच बोलत होता. मला गावातील लोकांचे फोन आले आणि तो किती भामटा आहे, वाळू माफिया आहे हे त्यांनी सांगितले, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस