शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 06:09 IST

अशी सुरू झाली राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा

- अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे दोघे एकत्र येणार म्हणून दोन दिवस बातम्या सुरू आहेत. मात्र, त्यात कसलेही तथ्य नाही. हे दोघे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्याला कारण ठरले दोन हर्षल. ठाकरेंच्या शिवसेनेत हर्षल प्रधान, तर राज ठाकरे यांच्याकडे हर्षल देशपांडे नावाचे प्रसिद्धीप्रमुख आहेत. या दोघांच्या एकमेकांशी झालेल्या चर्चेनंतर या बातमीने वेग घेतला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सध्या सुरू आहे. १९६६ पासून बाळासाहेबांच्या भाषणांचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. सुरुवातीची काही भाषणे राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती होती. त्यामुळे हर्षल प्रधान यांनी हर्षल देशपांडे यांना फोन केला. बाळासाहेब ठाकरे यांची ऑडिओ भाषणे, फोटो, पुस्तकं मिळू शकतील का?  स्मारकासाठी ती हवी आहेत, असे सांगितले. त्यावर हर्षल देशपांडे यांनी हे राज यांना सांगितले.

यासंदर्भात हर्षल प्रधान ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, तुम्हाला काय काय हवे आहे ते सांगा, म्हणजे मी काढून ठेवतो. तुम्ही येऊन पाहा, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे हर्षल देशपांडे यांचा निरोप आला. ही गोष्ट उद्धव यांना सांगितली तेव्हा त्यांनी, अशी सगळी माहिती असेल तर त्यांना काढू दे. आपण स्वत: जाऊन पाहू, असे सांगितल्याचेही प्रधान म्हणाले. अधिवेशन काळात उद्धव ठाकरे विधानभवनात आल्यावर त्यांनी ही गोष्ट काही पत्रकारांना सांगितली. त्यावर तुम्ही राज ठाकरेंकडे जाणार का, असा सवाल विचारला असता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कुठेही जायला तयार आहे, असे उत्तर उद्धव म्हणाले होते. सोमवारी टोलवरून आदित्य ठाकरेंनी आंदोलनाची भाषा केली. त्यावर मनसेनेही प्रतिक्रिया दिली. तेव्हाचा संदर्भ घेत काहींनी दोघे एकत्र येणार, अशा बातम्या सुरू केल्या.  

ऐवज यापूर्वीच दिलायबाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांची पुस्तके, सीडी, भाषणांच्या ऑडिओ असा सगळा ऐवज स्वत: राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडे दिला होता. त्यामुळे आता आपल्याकडे फार काही आहे, असे वाटत नाही. बघू, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिल्याचे मनसे प्रसिद्धीप्रमुख हर्षल देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे