शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता  

By मनीषा म्हात्रे | Updated: May 14, 2023 12:49 IST

केरळमधून 30 हजार महिला बेपत्ता झाल्याचे बोलले जात असताना महाराष्ट्रातील तरुणींच्या मिसिंग मिस्ट्रीचा चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सन 2020 पासून हरविलेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी / महिला बेपत्ता होत आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात १,६०० मुली बेपत्ता झाल्या तर, फेब्रुवारी महिन्यात १,८१० आणि मार्च महिन्यात सर्वाधिक २,२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस अपहरणाचा गुन्हा नोंदवत, तपास सुरू करतात. दिवसाला किमान तीन अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. या मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कानसारखे उपक्रम राबवूनही पोलिस मुलींचा शोध घेत आहेत. मात्र मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

मुंबईतील मुली गेल्या कुठे? -पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून २,२५८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१ तर सांगलीतून ८२ मुली बेपत्ता झाल्या आहेत.

प्रेम प्रकरण अन् बरंच काही -बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींचेही प्रमाण अधिक आहे. तसेच, काही प्रकरणात मुली सेक्स रॅकेट तसेच मानवी तस्करीच्या शिकार ठरताना दिसतात. तर, राजस्थान, गुजरातसारख्या काही ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी होण्याच्या घटनाही पोलिसांच्या कारवाईतून वेळोवेळी समोर येताना दिसतात.

गृहविभागाने तातडीने पावले उचलावीत -दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. यामध्ये सन २०२० पासून महाराष्ट्र हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणे आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणे आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्यावतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुंबईतील हरवलेल्या व्यक्तींच्या विभागांतून वेळोवेळी माहिती घेत असतो. प्रत्येक ठिकाणी मिसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही घेतला. यामध्ये राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. यासंदर्भात गृहविभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.- रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

टॅग्स :Missingबेपत्ता होणंMaharashtraमहाराष्ट्रRupali Chakankarरुपाली चाकणकरMumbaiमुंबईWomenमहिला