शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुठे उकाडा, कुठे पावसाचा तडाखा; उष्णतेमुळे अंगाची काहिली होत असताना अनेक ठिकाणी वळीवाचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 06:01 IST

मुंबई उपनगरात पनवेल डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी बरसल्या. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाटण तालुक्यातील मणदूर (जि. सातारा) येथे घरावरील छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.

मुंबई/पुणे : मुंबई उपनगरात पनवेल डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी बरसल्या. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाटण तालुक्यातील मणदूर (जि. सातारा) येथे घरावरील छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.कोल्हापुरात शिवजयंतीच्या मिरवणुका निघण्याची तयारी सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने, कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. सांगली जिल्ह्यात वाळवा, शिराळा आणि जत तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. सातारा शहर व परिसरासह पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाला.सोलापुरात बार्शी, करमाळा, माढा आणि पंढरपूर तालुक्याला वळीवाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे द्राक्ष व डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सिंधुदुर्गमध्ये कणकवलीतविजांच्या कडकडाटात पाऊस झाला. रत्नागिरीमध्ये देवरूख आणि चिपळूण परिसराला वळीवाने झोडपले. साखरपा, बावनदी परिसरातही पाऊस झाला. महाड शहरासह तालुक्यात सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक ठिकाणी घरांची हानी झाली आहे.

चंद्रपूर नव्हे, सूर्यपूर राज्यात सर्वात तप्त शहरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/पुणे : वैशाख वणव्यामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला असून, बहुतांश शहारांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर होते. मंगळवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४४़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.कोकण, मराठवाडा व विदर्भातील कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़ वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकरही हैराण झाले आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या घरात असले, तरी उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र