शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चार वर्षांत वाहनकराचे ३२,४०० कोटी गेले तरी कुठे? राज्यात एक किलोमीटर रस्त्यावर सरासरी १२८ वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 06:40 IST

महाराष्ट्रात १ जानेवारी २०२२ रोजी सर्व प्रकारची ४ कोटी ९ लाख वाहने होती त्यापैकी एकट्या मुंबईत ४२ लाख वाहने होती. हे प्रमाण राज्यातील एकूण वाहनांच्या १०.३ टक्के आहे.

मुंबई:  गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात नाेंदणी झालेल्या वाहनकरापाेटी राज्य सरकारला ३२,४०० काेटी रुपयांचा महसूल मिळाला.  मात्र ती वाहने ज्या रस्त्यावरून जातात त्यांची मलमपट्टी करण्याचे सौजन्यही सरकार दाखवत नाही. हा प्रकार प्रत्येक सरकारच्या काळात घडत आला आहे. कोणीही त्याला अपवाद नाही. लोक लाखो रुपये वाहन कर भरतात आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून सरकारला शिव्याशाप देत गाड्या चालवत राहतात.महाराष्ट्रात १ जानेवारी २०२२ रोजी सर्व प्रकारची ४ कोटी ९ लाख वाहने होती त्यापैकी एकट्या मुंबईत ४२ लाख वाहने होती. हे प्रमाण राज्यातील एकूण वाहनांच्या १०.३ टक्के आहे. एवढ्या गाड्या जेव्हा रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांना लागणारे रस्ते, पार्किंग याचे कोणतेही नियोजन या महानगरात होताना दिसत नाही. राज्यभरातील रस्त्यांचा विचार केल्यास एका किलोमीटरवर सरासरी १२८ वाहने आहेत. वाढत्या वाहन संख्येचा ताण रस्ते आणि वाहतुकीवर पडतच राहणार. त्यामुळे नवे रस्ते उभारतानाच मोनो, मेट्रो, लोकल रेल्वे अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. वाहनांवरील करापोटी राज्यात १० हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित होता. प्रत्यक्षात ६ हजार ६५५.१२ कोटींचाच कर जमा झाला. कोरोना निर्बंधांमुळे ही घट पाहायला मिळाली. चालू आर्थिक वर्षात वाहनांवरील करांपोटी १० हजार ५०० कोटी इतका कर जमा होण्याचा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. 

- रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी महाराष्ट्राने एकूण खर्चाच्या ५.७ टक्के निधीची तरतूद केली आहे. कोणत्याही राज्याने केलेल्या तरतुदीपैकी ही सर्वाधिक तरतूद आहे. - २०२१-२२ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने १५ हजार ९९६ कोटी रुपये तरतूद रस्ते आणि पुलांच्या कामासाठी केली होती.- मार्च २०२१ अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदांच्या देखभालीखालील रस्त्यांची एकत्रित लांबी ३.२१ लाख किमी. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकार