शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
2
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
3
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
5
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
6
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
7
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
8
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
9
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
10
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
11
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
12
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
13
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
14
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
15
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
16
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
17
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
18
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
19
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
20
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
Daily Top 2Weekly Top 5

ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 08:03 IST

मयत बाळासाहेब सरवदे यांची छोटी मुलगी माझे पप्पा मला सोडून गेले, असे म्हणत ढसाढसा रडत होती. अमित ठाकरे बराच वेळ निशब्द होते. त्यांचेही डोळे पाणावले.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरे सोलापूरला गेले होते. तिथल्या मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा महापालिका निवडणुकीत खून झाला. त्याच्या कुटुंबीयांना अमित ठाकरे भेटले. अमितला पाहून मयत बाळासाहेब सरवदे यांची छोटी मुलगी माझे पप्पा मला सोडून गेले, असे म्हणत ढसाढसा रडत होती. कोणाचेही मन हेलावेल असे ते दृश्य होते. 

अमित ठाकरे बराच वेळ निशब्द होते. त्यांचेही डोळे पाणावले. त्या परिस्थितीत सुद्धा ते सगळे वातावरण मोबाईल मध्ये शूट करणारे काही महाभाग तेथे होते. अमित यांनी त्यांना तेथून बाहेर काढले. शूटिंग करू नका, असे सांगितले. 

निवडणुकीच्या नावाखाली कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे खून होणार असतील तर अशा निवडणुका आम्हाला नको... आम्ही सगळे अर्ज परत घेतो... तुम्हीच जिंका... अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सरवदे यांच्या घरात आणि नंतर अमित यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि मनाची घालमेल ते लपवू शकले नाहीत. अमित हे कसलेले राजकारणी नाहीत. अजूनही त्यांच्याकडे ती संवेदनशीलता आहे. 

अशीच संवेदनशीलता जर इतर राजकीय नेत्यांकडे आली तर..? हल्ली फोनवरून कोणाची चौकशी केली किंवा कोणाला शुभेच्छा दिल्या, अथवा कोणाचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला तर त्याचेही व्हिडीओ शूटिंग करून व्हायरल केले जाते. त्या काळात अमितने शूटिंग करू न देणे आणि संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळणे ही बाब सध्याच्या भावनाहीन राजकारणात म्हणूनच वेगळी ठरली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Thackeray's empathy: A contrast in today's politics for workers.

Web Summary : Amit Thackeray consoled the family of a slain MNS worker, halting insensitive filming. His genuine emotion and concern highlight a rare sensitivity absent in much of today's politics, contrasting with leaders who prioritize staged, viral displays of empathy.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६MNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना