शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ घरी कधी येणार...? वाटेकडे कुटुंबाचे डाेळे, १७ दिवस लोटले, घरच्यांशी भेट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 09:31 IST

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची उपोषणाच्या १७ दिवसांत कुटुंबीयांसमवेत एक वेळही भेट झालेली नाही. भेट सोडा मोबाइलवरही संवाद झालेला नाही.

- पवन पवारवडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची उपोषणाच्या १७ दिवसांत कुटुंबीयांसमवेत एक वेळही भेट झालेली नाही. भेट सोडा मोबाइलवरही संवाद झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी उपोषणस्थळी आले आणि जरांगे यांचे आमरण उपोषण सुटले; परंतु, साखळी उपोषण सुरू आहे. त्यामुळे जरांगे हे घरी कधी येणार, याची प्रतीक्षा त्यांच्या पत्नीसह मुलं व आई-वडिलांना लागली आहे.

लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी जरांगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली. जरांगे यांनी दि. २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले. त्याच दिवशी कुटुंबातील सदस्यांची त्यांची भेट झालेली. त्यानंतर प्रत्येक घडामोडी या कुटुंबातील सदस्यांना टीव्हीवरून आणि शेजारी, नातेवाईक यांच्याकडून समजल्या. आपण उपोषणस्थळी गेलो तर ते भावनिक होतील, आपणही भावनिक होऊ म्हणून कुटुंबातील एकही सदस्य तिकडे गेला नाही. नव्हे १७ दिवसांत एक वेळेसही मोबाइलवर त्यांचे बोलणे झालेले नाही. 

मनोजची काळजी वाटते; परंतु, जनता त्याच्यासोबत आहे, त्यामुळे भीती वाटत नाही.- रावसाहेब जरांगे, वडील 

२२ वर्षे झाली, ते उपोषण करतात. आता कुठं आरक्षण मिळेल, असे वाटतेय. मी तेथे गेले तर माझ्या डोळ्यात पाणी येईल आणि ते त्यांना पाहवणार नाही. यामुळे मी तेथे गेले नाही.   - सुमित्रा जरांगे, पत्नी

मागील १७ दिवसांत वडिलांची एकदाही भेट झाली नाही. मी यापूर्वी शहागड येथील मोर्चात भाषण केलं. त्यानंतर बुलढाणा येथे भाषण केलं. माझी प्रेरणा माझे वडील आहेत. पप्पा घरी कधी येणार याची वाट पाहत आहे.  - पल्लवी जरांगे, मुलगी 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना