शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नुसती घोषणाच; महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज, यशवंत चव्हाणांचा पुतळा कधी बदलणार?

By समीर देशपांडे | Updated: February 8, 2025 15:51 IST

कोल्हापूर विमानतळाला नाव कधी देणार?

समीर देशपांडेकोल्हापूर : नवी दिल्लीतीलमहाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत पुतळे बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात करून बरोबर सात महिने उलटले. विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा सत्ता आली तरी याबाबतीत राज्य शासनाकडून काहीही हालचाल झालेली नाही.या पुतळ्यांबरोबरच कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेली २० वर्षे होत आहे. असे असताना पुतळे बदलले का जात नाहीत आणि विमानतळाला नाव का दिले जात नाही? असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.महाराष्ट्र सदनातील लोकराजा शाहू आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे दोन्ही पुतळे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत आहेत, असे वृत्त ‘लोकमत’ने ४ आणि ५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केले. यानंतर याबाबत कोल्हापुरातील मान्यवरांनी आणि संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.भाजप आणि जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठवून शासनाला पुतळा बदलणे शक्य नसल्यास कोल्हापूरकर दिल्लीतील हे पुतळे बदलतील, असा इशाराही दिला होता. याची दखल घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ५ जुलै २०२४ रोजी याबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.

मंत्री, खासदार, आमदारांनी भूमिका जाहीर करावीया दोन्ही पुतळ्यांबाबत आणि कोल्हापूरच्या विमानतळाबाबत दोन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. उठता, बसता शाहू महाराजांचे नाव घेणाऱ्या या सर्वांनी तातडीने याबाबत शासनाला निर्णय घेणे भाग पाडून अंमलबजावणी करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली